रायगड 05 सप्टेंबर : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला, ज्यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मात्र, याठिकाणी झालेला हा शेवटचा किंवा पहिलाच अपघात नाही. तर हे ठिकाण जणू मृत्यूचा सापळाच बनलं आहे. आजच खालापूरजवळ दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, कोल्हापुरातील Video
विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला. या रस्त्याने अनेक महत्त्वाचे नेते तसंच व्हीआयपी व्यक्ती प्रवास करत असतात. याशिवाय सर्वसामान्य नागरिकही या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांकडे गांभीर्याने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे.
मेटेंच्या अपघातानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहुतकीसंदर्भात निर्णय -
मेटेंच्या अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम (ITS) लावली जाणार आहे. जेणेकरून आपण सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवू शकतो. ट्रॉलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि याचा अपघातांचं प्रमाण घटण्यात कितपत फायदा होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर, शवविच्छेदन अहवालातून झालं उघड
दोन अपघातात १२ जण जखमी -
मुंबई-पुणे महामार्गावर पहाटे 3 च्या सुमारास दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण 12 जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात खालापूर येथे झाले आहेत. सर्व जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या भागातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Vinayak mete