Home /News /maharashtra /

दुहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला! 5 वर्षांच्या चिमुकल्यासमोर आई-बापाला संपवलं

दुहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला! 5 वर्षांच्या चिमुकल्यासमोर आई-बापाला संपवलं

श्वानावरून झाला वाद, लोखंडी रॉड डोक्यात घालून शेजाऱ्यानं केली निर्घृण हत्या.

    भंडारा, 15 जुलै: पूर्ववैमनस्यातून शेजाऱ्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची रॉडने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं भंडारा हारदला आहे. सालेबर्डी गावात राहणाऱ्या आरोपी मंगेश गजभियेने आपल्या शेजाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. पूर्ववैमनस्यातून ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. भंडारा तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारधा पोलीस ठाणा हद्दीत सालेबर्डी इथे आरोपी मंगेशचा शेजारी असलेल्या विनोद बागडे सोबत सातत्याने वाद सुरू होते. विनोग बागडे राहत्या घरातून अवैध दारू विक्री करत असल्यानं शेजारी राहणाऱ्या आरोपी मंगेशसोबत त्याचे खटके उडत होते. या दोघांनीही परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. हा वाद मात्र एका श्वानामुळे विकोपाला गेल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा-पावसात नाचू लागले हिरवे नाही तर पिवळे बेडुक; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO नेमकं काय घडलं... मंगळवारी रात्री मृतक विनोदचा पाळीव कुत्रा हा आरोपी मंगेशच्या घरी गेल्यानं राग आला आणि त्याने कुत्र्याला मारहाण केली. यावरून मंगेश आणि विनोदमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संताप अनावर झाल्यानं आरोपी मंगेशनं शेजारी असलेल्या लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीवरही रॉडने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं विनोद आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्यांच्या चिमुकल्या मुलानं पाहिली. त्यानंतर घटनेला संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यात जाऊन कबूल केला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bhandara s13a061

    पुढील बातम्या