• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल, आमदारांसोबत बसमधूनच प्रवास

Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल, आमदारांसोबत बसमधूनच प्रवास

Maharashtra Political Updates: आज शिंदे-फडणवीस सरकारच बहुमत चाचणी पार पडली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. राज्यात आता शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे.

 • News18 Lokmat
 • | July 04, 2022, 21:33 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:29 (IST)

  'रायगडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता'
  रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली - फडणवीस
  'संपूर्ण स्थितीची माहिती घेऊन योग्य निर्देश दिले'

  23:8 (IST)

  'सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्वांना न्याय देणार'
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाणेकरांसमोर ग्वाही

  21:58 (IST)

  बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी, अतिवृष्टी काळात धबधब्यांच्या ठिकाणी जाणं टाळा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचं आवाहन

  21:49 (IST)

  मुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार हजेरी
  मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवेवर परिणाम
  मध्य रेल्वेची सेवा 10-15 मिनिटं उशिरानं
  हार्बर लाईनची सेवा 15-20 मिनिटं उशिरानं

  21:35 (IST)

  मुख्यमंत्री शिंदेंचं ठाणेकरांकडून जल्लोषात स्वागत
  शिंदे समर्थकांचं ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन
  ढोलताशांचा गजर, फुलांची उधळण करत स्वागत
  धर्मवीर दिघेंच्या शक्तिस्थळाचं घेतलं दर्शन
  आनंदाश्रमला भेट, पुतळ्यालाही अभिवादन

  21:24 (IST)

  मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात जल्लोषात स्वागत
  फुलांची उधळण करत केलं जंगी स्वागत
  शिंदे समर्थकांचं ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन

  20:50 (IST)

  जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 

  रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचं पाणी इशारा पातळीवर

  19:53 (IST)

  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी मुख्यमंत्री दाखल
  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिंदे नतमस्तक

  19:36 (IST)

  कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली
  पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक फूट वाढ
  कोल्हापूर जिल्ह्यात 4 बंधारे पाण्याखाली

  19:27 (IST)

  मुंबई आणि उपनगरात ऑरेंज अलर्ट
  पावसाचा मुंबईच्या रेल्वेसेवेवरही परिणाम

  Maharashtra Political Updates: आज शिंदे-फडणवीस सरकारच बहुमत चाचणी पार पडली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. राज्यात आता शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे.