लॉकडाऊमध्ये ICICI बँकेत निघाला 7 फूट लांब कोब्रा, पाहा थराराक VIDEO

लॉकडाऊमध्ये ICICI बँकेत निघाला 7 फूट लांब कोब्रा, पाहा थराराक VIDEO

साप बराच वेळ ATMच्या आसपास फिरत होता. त्यानंतर त्यानं ATMवर चढून कब्जा केला.

  • Share this:

गाझियाबाद, 09 मे : देशभरात कोरोनामुळे 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनदरम्यान माणसांची रहदारी कमी झाल्यामुळे अनेक प्राणी आणि सर्प रस्त्यावर किंवा बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. अशी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे घडली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमधून पैस नाही तर 7 फूट लांब कोब्रा निघाल्यानं मोठी खळबळ उडाली. ह्या कोब्रानं एटीएमवर जवळपास कब्जा केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा साप एटीएममध्ये घुसतानाच एका तरुणानं पाहिलं होती. त्यानं याची माहिती सिक्युरिटी गार्डला दिली. साप घुसल्यामुळे मोठी खळबळ उडाली आणि हा कोब्रा बाहेर जाऊ नये म्हणून एटीएमचा दरवाजा बाहेरून लॉक करण्यात आला.

ही घटना गाझियाबाद इथल्या गोविंदपूरम देहरादून सार्वजनिक शाळेवर जे-ब्लॉक मार्कमध्ये आयसीआयसीआयच्या बँकेत हा प्रकार घडला. हा साप बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागला मात्र जाण्यासाठी कुठेही रस्ता मिळत नव्हता अखेर एटीएमच्या मशीमध्ये घुसण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचा-बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

ह्या सापानं दंश केला तर साधारण अर्ध्या तासात माणसाचा मृत्यू होऊ शकतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे. साप बराच वेळ ATMच्या आसपास फिरत होता. त्यानंतर त्यानं ATMवर चढून कब्जा केला. बाहेर उभे असलेले लोक मोबाईलवरून या सापाचे व्हिडीओ काढत होते. वन विभागाला या घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हा साप अर्धा एटीएमच्या आत घुसला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर या सापाला एटीएममधून बाहेर काढण्यात यश आलं.

या कोब्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ATM बाहेरुन बंद केल्यामुळे हा साप कुणाला इजा करू शकला नाही. यामुळे दुर्घटना घडली नाही. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या कोब्र्याला वन विभागाच्या हवाली करण्यात आलं आहे. मात्र काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

हे वाचा-नको ते धाडस पडलं महागात! सिंहासोबत सेल्फी घेणं तरुणाला चांगलंच भोवलं, पाहा VIDEO

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: May 9, 2020 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading