मुंबई, 18 ऑगस्ट : महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोना नियंत्रणात आलाय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकल ट्रेनपासून, बाजार, दुकानं सर्व सुरुळीत सुरु आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढतोय. विशेषत: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. पण आज दोन महिन्यांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ही चार आकडी आढळली आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनानं डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आली होती. पण आता शहरात कोरोना पुन्हा फोफावतोय. मुंबई शहरात दोन महिन्यांनंतर आज पहिल्यांदा चार आकडी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 1201 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या उत्साहाचं वातावरण आहे. दहीहंडी उत्सव उद्याच आहे आणि गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यापाठोपाठ नवरात्र, दसरा, दिवाळी सण एका पाठोपाठ येणार आहेत. अशा परिस्थितीत आज कोरोना रुग्णांची समोर आलेली नवी आकडेवारी हे चिंता वाढवणारं आहे. ( दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, गोविंदांना असा होणार फायदा ) मुंबईत गेल्या 24 तासात 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97.8 टक्के इतकं आहे. मुंबईत सध्या 5712 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा 949 दिवस इतका आहे. मुंबईत आतापर्यंत 11 लाख 10 हजार 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2022
१८ ऑगस्ट, संध्या. ६:०० वाजता#कोरोनालाना #NaToCorona pic.twitter.com/QrkZyFgSAk
मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत काल नव्या रुग्णांची संख्या ही 975 इतकी होती. तर 15 ऑगस्टला 584 इतकी रुग्णसंख्या होती. विशेष म्हणजे मुंबईत 30 जूनला नव्या रुग्णांची संख्या ही चार आकडी होती. त्यानंतर आज चार आकडी संख्या आढळली आहे.