मुंबई, 16 जुलै: हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाइटवर याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही आपण पाहू शकता. यंदाचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींची सरशी आहे. मागच्या वर्षीपेक्षा 4.78 टक्क्याने निकाल चांगला लागला आहे.
बारावीचा निकाल लागला आहे. पण दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. कोरोना व्हायरसमुळे दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे निकाल लवकर लागेल अशी अशा विद्यार्थी-पालकांना होती. दहावीचा निकाल जुलै अखेर पर्यंत लागेल अशी चर्चा आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. द्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनामुळे 23 मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलं आहे.