अशोक नगर (म.प्र), 23 मे : मध्य प्रदेशच्या ( Madhya Pradesh) चंदेरी (Chanderi) मध्ये कोरोनाच्या कर्फ्यू (Corona Curfue) दरम्यान एक बाईकवर कारवाईनंतर जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. कारवाईत पोलिसांनी दंडाची पावती दिल्यानंतर बाईकचा लाईट फोडल्याच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा (police fined Husband and broke light of Bike) झाला. कारवाई झाल्यानंतर तरुण घरी गेला होता. पण त्याच्या पत्नीने त्याला कारण विचारले तर ती संतापली. त्यानंतर थेट कारवाई करणाऱ्या पोलिसाकडे पत्नी गेली आणि तिनं तिथं चांगलाच ड्रामा (Wife get angry for broking light) केला. त्यानंतर या सर्वाची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
(वाचा-Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, 8 पट अधिक अँटिबॉडीज)
कोरोनाच्या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पोलिस मास्क न लावता आणि विना कामाच्या फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान अशोक नगरमध्ये चंदेरी इथं एक तरुण बाईकवरून जात होता त्यावेळी त्याला पोलिसांनी अडवलं. त्याची चौकशी केली आणि त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसानं त्या तरुणाच्या बाईकचा हेडलाईटही फोडला. तरुणानं पोलिसांच्या या कृत्याचा विरोध केला नाही. दंडाची पावती घेऊन तो थेट घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर पत्नीनं त्याला गाडीचा हेडलाईट फुटण्यामागचं कारण विचारलं. त्यावर तरुणानं पत्नीला सर्व काही सांगितलं.
पतीनं सांगितलेली घटना ऐकून महिलेचा पारा वर गेला. ती प्रचंड संतापली आणि थेट पोलिसांची खबरबात घ्यायला ही महिला निघाला. पोलिस कारवाई करत असलेल्या ठिकाणी ही महिला पोहोचली आणि तिनं प्रचंड गदारोळ केला. दंडाची कारवाई केल्यानंतर बाईकचा हेडलाईट फोडल्याप्रकरणी त्याठिकाणी असलेल्या स्टाफला या महिलेनं चांगलंच सुनावलं. याठिकाणी उपजिल्हाधिकारी देवेंद्र सिंहदेखिल उपस्थित होते.
(वाचा-दोन्ही तरुण मुलांचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; कोरोनाबाधित बापानेही सोडला जीव)
ही महिला एवढ्या रागात होती की, तिनं चप्पल हाती घेत प्रचंड हंगामा केला. यादरम्यान तिनं त्याठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चप्पल मारली देखिल. एवढंच नाही तर उपजिल्हाधिकाऱ्यांना चप्पल मारायलाही ती धावली होती. पण पोलिसांनी तिला अडवलं. त्यानंतर स्थानिक लोकांनी समजावल्यानंतर खूप वेळानं या महिलेचा राग शांत झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Madhya pradesh, Police action