मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, मिळतील 8 पट अधिक अँटिबॉडीज, भारतीय उष्ण वातावरणासही अनुकूल

Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, मिळतील 8 पट अधिक अँटिबॉडीज, भारतीय उष्ण वातावरणासही अनुकूल

IISc Bengaluru corona vaccine कोरोना व्हायरसवर देशात औषध तयार करण्यात आल्यानंतर आता या संकटासाटी अशी लस तयार करण्याचं काम सुरू आहे, जिच्यासाठी फार मेंटेनन्स लागणार नाही. लसीचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे पण बाजारात ही लस उपलब्ध व्हायला अंदाजे एक वर्ष लागेल.

IISc Bengaluru corona vaccine कोरोना व्हायरसवर देशात औषध तयार करण्यात आल्यानंतर आता या संकटासाटी अशी लस तयार करण्याचं काम सुरू आहे, जिच्यासाठी फार मेंटेनन्स लागणार नाही. लसीचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे पण बाजारात ही लस उपलब्ध व्हायला अंदाजे एक वर्ष लागेल.

IISc Bengaluru corona vaccine कोरोना व्हायरसवर देशात औषध तयार करण्यात आल्यानंतर आता या संकटासाटी अशी लस तयार करण्याचं काम सुरू आहे, जिच्यासाठी फार मेंटेनन्स लागणार नाही. लसीचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे पण बाजारात ही लस उपलब्ध व्हायला अंदाजे एक वर्ष लागेल.

पुढे वाचा ...

बेंगळुरू, 23 मे : कोरोना व्हायरसच्या (coronavirus) विरोधातील युद्धात भारतासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे कोरोनाच्या लसींची कमतरता. मात्र आता भारतीय शास्त्रज्ञही या शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज आहेत. भारतात एक अधिक प्रभावी अशी लस तयार होत आहे. बेंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ( Indian Institute of Science) मध्ये त्यावर काम सुरू आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ही नवी लस कोरोनाच्या इतर व्हेरीएंटसचे विषाणू संपवण्यास सक्षम असेल. (IISc Bengaluru corona vaccine )

IISc च्या मॉलिकुलर बायोप्सिस युनिटच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी अशा अणुंचा शोध लावला आहे जे कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. हे अणु न्यूट्रलाइजिंग अँटी बॉडीज मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाटी सक्षम आहेत. त्यामळं त्यांचा परिणाम भारतात आधीपासून उपस्थित असलेल्या लसींच्या तुलनेत अधिक असेल. मॉलिकुलर बायोप्सिसचे प्रोफेसर राघवन वरदाराजन म्हणाले की, हे अणु शरिरात मोठ्या प्रमाणावर न्यूट्रलाइजिंग अँटिबॉजीड तयार करतात. त्यामुळं ते व्हारससाठी धोकादायक आहे.

(वाचा-Google चं भन्नाट फीचर, तुम्ही सर्च केलेली माहिती खरी की खोटी? गुगल देणार डिटेल्स)

8 पट अधिक अँटिबॉडीज होतील तयार

उंदीर आणि ससे यांच्यावर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये या अणुंची कामगिरी चांगली राहिली आहे. ज्या प्राण्यांवर या फॉर्म्युल्याची चाचणी करण्यात आली, त्यात कोविडमधून सावरलेल्या रुग्णांमध्ये मिळालेल्या अँटिबॉडीजच्या तुलनेत आठ पट अधिक अँटिबॉडी मिळाल्या. शास्त्रज्ञांच्या मते अँटिबॉडी अधिक असण्याचा फायदा असा असतो की, त्यांचे प्रमाण कमी झाले तरी आजारापासून वाचण्यासाठी शरीरात पुरेशी क्षणता असेल.

भारतीय वातावरणासाठी अनुकुल

नव्या लसीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वातावरणासाठी ती अनुकूल असेल. म्हणजे ही लस रूम टेम्परेचरवरदेखिल साठवली जाऊ शकेल. भारतात आतापर्यंत असा लसींचा वापर होतोय ज्या अत्यंत कमी तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळं त्या खराब होण्याचा धोका अधिक असतो. पण जर लसी रूम टेम्परेचरमध्ये ठेवता आल्या तर लसीकरण अधिक सोपे होऊ शकेल.

(वाचा-दोन्ही तरुण मुलांचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; कोरोनाबाधित बापानेही सोडला जीव)

लसीमध्ये वेगळे काय

शास्त्रज्ञांच्या मते ते तयार करत असलेल्या लसीमध्ये सबयुनिट लस आहे. व्हायरसच्या सरफेसवर असलेल्या स्पाइक प्रोटीनची बाइंडिंग क्षमता रिसेप्टर आणि सेल्सवर सर्वाधिक असते. त्याला रिसेप्टर बाइंडिंग डोमेनही म्हणतात. स्पाइक प्रोटीन 1700 अमिनो अॅसिड लांब असते. लसीमध्ये असलेला रिसेप्टर बाइंडिंग डोमेन याचा सूक्ष्म अंश आहे. तो 200 अमिनो अॅसिड लांब आहे. शास्त्रज्ञांच्या मते सध्या देशात असलेल्या कोणत्याही लसीमध्ये सबयुनिट लस नाही. या लसीवर IISc गेल्या वर्षापासून काम करत आहे.

शास्त्रज्ञांना लसीच्या फॉर्म्युल्यावर पूर्ण विश्वास आहे. पण क्लिनिकल डेव्हलपमेंट आणि नंतर ह्युमन ट्रायल होईपर्यंत सुमारे 9-10 महिन्यांचा वेळ निघून जाईल. म्हणजे वर्षभरानंतरच ही लस देशाला मिळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Bengaluru, Corona vaccine, Coronavirus