नोएडा, 23 मे : येथील अनेक गावांमध्ये अद्याप कोरोनाचा कहर सुरू आहे. जलालपुर गावात 9 मे रोजी एका तासाच्या अंतराने दोन तरुण मुलांच्या मृत्यूनंतर शनिवारी वडिलांचाही कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतर सिंह यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. कोरोनाने देशभरात कहर माजला आहे. जीवाभावाची माणसं डोळ्यासमोर नाहिशी होत चालली आहे. अनेक कुटुंबच्या कुटुंब संपली आहेत.
अतर सिंह यांच्या कुटुंबाचाही कोरोनाचा घास घेतला. याबाबत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, अतर सिंहच्या कुटुंबात आता एक मुलगा शिल्लक आहे आणि आता त्याच्या खाद्यांवरच कुटुंबाची जबाबदारी आहे. यादरम्यान गावात आणखी एका महिलेचाही मृत्यू झाला आहे.
जलालपूर गावाचे निवासी रविंद्र भाटी यांनी सांगितलं की, अतर सिंह यांना तीन मुलं होती. 9 मे रोजी दोन मुलांचा एक एक तासाच्या अंतराने मृत्यू झाला. सर्वात पहिला मुलगा पंकज (24) याचा 9 मे रोजी अचानक मृत्यू झाला. गावकऱ्यांसह मुलाला मुखाग्नी देऊन अतर सिंग घरी पोहोचले तेव्हा दुसरा मुलगा दीपक (28) याचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, दोन्ही मुलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
हे ही वाचा-मास्कमधून पसरतोय Black Fungus? तुम्ही ही चूक तर करीत नाही ना...
वडिलांचा बसला जबर धक्का
28 एप्रिल पासून गावात मृत्यूचा तांडव सुरू झाला होता, जो अद्यापही सुरू आहे. दोन मुलांच्या मृत्यूनंतर वडील अतर सिंह यांना जबर धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र रात्री तब्येत अचानक खराब झाल्यामुळे अतर सिंह यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच रात्री त्यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांचं म्हणणँ आहे की, गावात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे. मात्र तरीही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग गांभीर्याने घेत नाही. केवळ एकच दिवस कोरोना चाचणी शिबीर लावले. सॅनिटायजेशनदेखील आम्ही स्वत:च केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid-19 positive