बापरे! एका मतदानासाठी भूमी पेडणेकरने चक्क एवढ्या तासांचा प्रवास केला

बापरे! एका मतदानासाठी भूमी पेडणेकरने चक्क एवढ्या तासांचा प्रवास केला

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला झाले. या दिवशी मतदान करावं म्हणून भूमीने असं काही केलं की तिचं आज प्रत्येकजण कौतुक करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल- 'दम लगा के हैशा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या भूमी पेडणेकरचं नाव कोणाला माहीत नाही असं होणं शक्य नाही. एकाहून एक सरस सिनेमांमध्ये काम केल्यानंतर लवकरच भूमी अनुराग कश्यपच्या 'सांड की आंख' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या पुण्यात सुरू आहे.

भूमीसह इतर कलाकारही पुण्यात काम करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होते. या दिवशी मतदान करावं म्हणून भूमीने असं काही केलं की तिचं आज प्रत्येकजण कौतुक करत आहेत.

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

 

View this post on Instagram

 

I am the dragon's daughter - Daenerys Targaryen 🐉 #Mood . . . #goodmorning #tuesday #gameofthrones #waiting

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

मीडिया रिपोर्टनुसार, भूमीने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि आपलं कर्तव्या पार पाडण्यासाठी आठ तासांचा प्रवास करत मतदान केलं. भूमीने मतदानानंतरचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअरही केला. विशेष म्हणजे मतदान करता यावं यासाठी तिने दिग्दर्शकाकडे एका दिवसाची सुट्टीही मागितली होती. मतदान करण्यासाठी ती पुण्याहून मुंबईत आली आणि मतदान झाल्यावर ती पुन्हा पुण्यात गेली.

कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा

 

View this post on Instagram

 

World's Oldest Sharp Shooters - Chandro Tomar and Prakashi Tomar ❤️ the coolest SHOOTER DADIS 😎 My heart is full of gratitude, to be able to be a part of their bloody extraordinary story. The more time I spend with them, the more I realise how great their achievements are. They are so special and blessed 🙏🏻 इतने प्यार और सम्मान के लिए थैंक यू।वी लव यू @shooterdadiofficial @shooterdadi 😘🇮🇳 Thank you @tusharhiranandani @nidhiparmarhira for putting in your everything to make this happen and making us a part of it. Really such immense love for you both🙏🏻 This journey is unlike any other with my sister in arms @taapsee ❤️ #saandkiaankh #goodmorning #monday #motivation #shooterdadi

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

मतदानाबद्दल बोलताना भूमी म्हणाली की, ‘भारतीय नागरिकाच्या नात्याने मी दरवेळी मतदान करते. माझ्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं पण तरीही मी दिग्दर्शकाला आणि प्रॉडक्शनच्या टीमला सांगितलं की मी डबल शिफ्ट करून काम संपवेन आणि मुंबईत मतदानाला जाईल. हा आठ तासांचा प्रवास थकवणारा होता. पण प्रत्येक मत हे मोलाचं आहे.’

'नाणं एकदम खणखणीत', गॉडफादर नसतानाही 'हे' सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी

कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

First published: April 30, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading