Live Update: अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर शिंदे गटात

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत उमेदवार शशी थरूर यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली.

 • News18 Lokmat
 • | October 20, 2022, 19:40 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:34 (IST)

  अजित पवारांना साखर आयुक्तांचा दणका
  10 गावं कारखाना हद्दीत समाविष्ट करण्याचा ठराव
  माळेगाव कारखान्याचा ठराव नामंजूर
  साखर आयुक्तांकडून कारखान्याचा ठराव नामंजूर
  सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतली 10 गावं...
  ...माळेगाव कारखान्याच्या हद्दीत केलेली समाविष्ट

  20:58 (IST)
  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुखांची बदली, अंकित गोयल नवे अधीक्षक
   
  20:58 (IST)
  पुणे - 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा दणका, शेवाळेवाडीतील हायवेवरील पाणीकोंडी अखेर रात्रीतून फोडणार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखांनी दिले प्रशासनाला आदेश, सोलापूर हायवेवर तुंबलेल्या पाण्याचा निचरा होणार, शेवाळेवाडीचे माजी सरपंच राहुल शेवाळेंची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती, 3 दिवसांनंतरही हायवेवर पावसाचं पाणी तुंबल्याची बातमी दाखवली होती, पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
   
  20:44 (IST)

  मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक
  एमसीएच्या अध्यक्षपदी अमोल काळे
  अमोल काळेंकडून संदीप पाटील पराभूत

  20:17 (IST)

  मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्ह्याला दिवाळी भेट
  17 हजार कोटींच्या प्रकल्पांना दिली मान्यता
  आता ठाणे जिल्ह्याचा होणार कायापालट
  'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी

  20:15 (IST)

  बीडमधील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, बीडच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

  19:43 (IST)

  रायगड जिल्ह्यातील 20 हजार कोटींच्या कागदनिर्मिती उद्योगास मान्यता, कोविड काळातील औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधीत दोन वर्षांची वाढ, राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणार, उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

  19:35 (IST)

  एमएमआरडीएच्या बैठकीत विविध प्रकल्प मेट्रो, रस्ते, वाहतूक प्रकल्पांना मान्यता, मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकासकामं वेळेत पूर्ण करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:31 (IST)

  कोल्हापूर - मनसेच्या आंदोलनानंतर पोलिसांना जाग
  चंदगडमधील मटका बुकींवर कारवाई, दोघांवर गुन्हा
  मटका खेळाच्या साहित्यासह 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

  19:4 (IST)

  दिवाळीनिमित्त 'आनंदाचा शिधा' रेशन दुकानावर
  चणाडाळ, साखर, रवा आणि पामतेल मिळणार
  100 रुपयांमध्ये 4 वस्तू सर्वसामान्यांना मिळणार
  1 कोटी 62 लाख शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

  Live Update: अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर शिंदे गटात