Pro Kabaddi League-2021: पटना पायरेटसने हरयाणा स्टीलर्सवर अवघ्या तीन गुणांनी विजय मिळवला

आज (गुरुवार) लीगमध्ये तीन सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना गुजरात जायंट्स(gujarat giants ) विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (pink penthers) होणार आहे.

 • News18 Lokmat
 • | December 23, 2021, 22:51 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:49 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match : अटीतटीच्या सामन्यात पटना पायरेटसने हरयाणा स्टीलर्सवर अवघ्या तीन गुणांनी विजय मिळवला.

  22:37 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match : पटना पायरेटसच्या मोनू गोयतने निर्णायक क्षणी तीन गुण मिळवून दिले. त्यामुळे आघाडी 37-34 झाली आहे.

  22:21 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match : हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटसमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये दोन ते तीन गुणांचा फरक आहे. 

  22:12 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match : आजच्या दिवसाचा तिसरा सामना हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटसमध्ये सुरु आहे. पहिल्या हाफमध्ये हरयाणा स्टीलर्सकडे 22-18 अशी चार गुणांची आघाडी आहे. उत्कृष्ट पकडीमुळे हरयाणाला पटनावर ही आघाडी मिळवता आली आहे. रेड म्हणजे चढाईत हरयाणाने 13 तर पटनाने 14 गुण मिळवले आहेत.

  21:49 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match : प्रो कबड्डी लीगमध्ये दिवसाचा तिसरा सामना हरियाणा स्टीलर्स आणि पटना पायरेट्स यांच्यात खेळला जात आहे. पाटणा पायरेट्स तीन वेळा चॅम्पियन संघ आहे.

  21:44 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match delhi-kc-vs-puneri-paltan: नवीन कुमारच्या दमदार कामगिरीच्या बळावर दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 11 गुणांनी पराभव केला. दिल्लीचा हा पहिला विजय आहे. दिल्लीने पुण्यावर 41-30 असा विजय मिळवला.

  21:37 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match delhi-kc-vs-puneri-paltan: पुणेरी पलटन ऑलआऊट. दिल्लीकडे 11 गुणांची निर्णायक आघाडी. दबंग दिल्ली 37-26 ने पुढे.

  21:31 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match delhi-kc-vs-puneri-paltan: दिल्लीची पुण्यावर आघाडी, दिल्ली 37-26 ने पुढे

  21:22 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match delhi-kc-vs-puneri-paltan: दुसऱ्या हाफमध्ये पुण्याने कमबॅक केलं आहे. पुण्याने पॉईंटसमधील अंतर कमी केलं आहे. दबंग दिल्लीला ऑलआऊट केलं आहे.

  21:7 (IST)

  Pro Kabaddi League 2021 Live Match delhi-kc-vs-puneri-paltan: पहिल्या हाफचा खेळ संपला असून दिल्लीकडे सात गुणांची आघाडी आहे. दिल्लीचे 22 तर पुण्याचे 15 गुण झाले आहेत. रेड म्हणजे चढाईत दिल्लीने 13 तर पुण्याने चढाईत 11 गुण मिळवले आहेत.

  Pro Kabaddi League 2021 LIVE UPDATES: प्रो कबड्डील लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनला जोरदार सुरुवात झाली आहे. काल, Bengaluru Bulls आणि U Mumba मध्ये पहिला सामना रंगला होता. आज (गुरुवार) लीगमध्ये तीन सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना गुजरात जायंट्स(gujarat giants ) विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (pink penthers) होणार आहे.

  प्रो कबड्डी लीगमधील (Pro Kabaddi League) गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धेतील सर्व सामने हे बंगळुरूमध्ये होणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

  जयपूरच्या संघाने एकदा प्रो कबड्डीचे विजेतेपद पटकावले असले तरी गेल्या 6 हंगामात फ्लॉप ठरला आहे. त्याच वेळी, गुजरात जायंट्स गेल्या 3 हंगामात जबरदस्त कामगिरी करूनही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. यातील गुजरातने 3 तर जयपूरने 2 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

  बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा हा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात विजेता ठरला. मात्र यानंतर संघाने पुढील 6 मोसमात विजयापेक्षा जास्त पराभव पत्करला आहे. प्रो कबड्डीमधील संघाची एकूण कामगिरी अशी आहे. एकूण  126 सामने खेळले आहेत. तर 54 सामन्या विजय मिळवला आहे तर 61 सामन्यात पराभव स्विकाराव लागला आहे. आणि 11 सामने अनिर्णीत आहेत.

  प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात गुजरातची एंट्री झाली आहे. या संघाने आतापर्यंतच्या तीन मोसमात दमदार खेळ दाखवला आहे. हा संघ टॅकलमध्ये मास्टर आहे. संघाच्या 45% टॅकल यशस्वी आहेत. आत्तापर्यत या संघाने 71 सामने खेळले आहेत. त्यामधील 41 सामन्यात विजय  मिळवला आहे. तर 23 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

  मॅचचा कालावधी किती?

  एका मॅचचा कालावधी 40 मिनिटांचा असतो. 20-20 मिनिटांच्या दोन हाफमध्ये मॅचची विभागणी होते. हाफ टाईममध्ये 5 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. या ब्रेकनंतर दोन्ही टीमची साईड बदलते.

  स्कोअरिंग पद्धत काय आहे?

  विरोधी टीमचा प्रत्येक खेळाडू आऊट केल्यानंतर एक पॉईंट मिळतो. ऑल आऊट केल्यानंतर 2 बोनस पॉईंटची कमाई होते.  3 किंवा कमी खेळाडू असताना रेडरला आऊट केल्यास  डिफेंडिंग टीमला बोनस पॉईंट दिला जातो.

  टाईम आऊट कधी?

  मॅचच्या दरम्यान दोन्ही टीम 90 सेकंदाचा टाईम आऊट घेऊ शकतात. टाईम आऊट हा कोच, कॅप्टन किंवा कोणताही खेळाडू रेफ्रीच्या परवानगीने घेऊ शकतो. त्यावेळी मॅच थांबवली जाते. त्यानंततर पुन्हा जिथं मॅच थांबली आहे त्याच ठिकाणी ती पुन्हा सुरू होते. एखादा खेळाडू जखमी झाला तर मॅच रेफ्री किंवा ऑफिशियल टाईम आऊट घेतात. हा टाईम आऊट दोन्ही टीमच्या टाईम आऊटपेक्षा वेगळा असतो.