अलाहाबाद ,15 फेब्रुवारी : अलाहाबाद बँकेत (Allahabad Bank) तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ अलाहाबादच इंडियन बँकेत (Indian Bank) विलीनीकरण करण्यात आलं आहे. यामुळं बँकेच्या आयएफसी (IFSC) कोडमध्ये देखील बदल झाला आहे. यामुळं यापुढं ग्राहकांनी नवीन कोडचा वापर करायचा असून हा नवीन कोड नसल्यास ग्राहकांना नवीन व्यवहार करता येणार नाहीत. बँकेनं ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली असून 1 एप्रिल 2020 ला बँकेचं विलीनीकरण झालं होतं.
इंडियन बँकेनं आपल्या ट्विटरवरून यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. इंडियन बँकेत अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. 15 तारखेपासून होणाऱ्या बदलांची माहिती देखील त्यांनी ग्राहकांना दिली आहे.
या पद्धतीनं तपासा IFSC Code
1)नवीन IFSC कोड मिळवण्यासाठी सर्वात आधी
www.indianbank.in/amalgamation या वेबसाईटवर लॉगईन करा.
2)यानंतर तुमचा जुना IFSC कोड टाका.
30या ठिकाणी जुना कोड टाकल्यानंतर तुम्हाला नवीन IFSC कोड मिळेल.
हे ही वाचा-Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार
SMS द्वारे देखील मिळणार नवीन कोड
या नवीन सुविधेमध्ये तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून देखील नवीन IFSC कोड मिळणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ IFSC<Space><OLD IFSC> या फॉरमॅटमध्ये 9266801962 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. याचबरोबर बँकेनं यापुढं ग्राहकांना 15 फेब्रुवारीपासून ‘IDIB या शब्दांनी सुरु होणाऱ्या IFSC कोडचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
याचबरोबर होणार हे चार बदल
बँकेचं विलीनीकरण झाल्यानंतर मोठे चार बदल देखील झाले आहेत. बँकेनं ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली असून विलीनीकरणादरम्यान ग्राहकांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचं आभार देखील मानलं आहेत. 15 फेब्रुवारी पासून हे बादल होणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
1)अलाहाबाद बँकेच्या आयएफसी(IFSC Code) कोडमध्ये देखील बदल झाला आहे.
2) बँकेचं मोबाईल बँकिंग अप emPower’ आता ‘IndOASIS नावानं असणार आहे.
3) नेट बँकिंगमध्ये देखील बदल होणार आहेत.
4) याचबरोबर चेकबुक आणि पासबुकमध्ये देखील बदल होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.