जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार

Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार

Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार

गुगल (Google) ही जगातली बलाढ्य सर्च इंजिन कंपनी. गुगलवर फ्रान्स आणि आयर्लंडमध्ये मोठा दंड लावण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस, 15 फेब्रुवारी : गुगल आयर्लंड (Google Ireland) आणि गूगल फ्रान्स (Google France) यांनी 11 लाख युरोचा (1.34 मिलियन डॉलर्स)  दंड भरण्याचं शेवटी कबूल केलं आहे. एका तपासादरम्यान गुगलच्या हॉटेल रँकिंग्ज या ग्राहकांची दिशाभूल (misleading hotel rankings) करणाऱ्या असल्याचं स्पष्ट झालं. फ्रान्सचं अर्थमंत्रालय (Finance ministry of France) आणि फ्रॉड वॉचडॉग (fraud watchdog) यांनी हे सोमवारी स्पष्ट केलं. मंत्रालय आणि वॉचडॉग यांनी एका वक्तव्यात असंही म्हटलं, की गूगलनं सप्टेंबर 2019 पासून त्याच्या हॉटेल रँकिंग्जमध्ये बदल केले आहेत. मागच्याच वर्षी फ्रान्सच्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटर (CNIL) (Data privacy regulator of France) नं गूगल आणि अमेझॉनवर मोठा दंड लावला होता. गूगलवर तब्बल 10 कोटी युरोचा दंड लावला गेला होता. रेग्युलेटरकडून गूगलवर लावला गेलेला हा सर्वात मोठा दंड होता. त्यावेळी डेटा प्रायव्हसी कंपनी CNIL म्हणाली होती, की अमेरिकेची इ-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर (amazon) याच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 35 मिलियन युरोज इतका दंड लावला गेला होता. रेग्युलेटरला आढळलं होतं, की गूगल आणि अमेझॉनच्या फ्रेंच वेबसाइट्सनी कम्प्युटर्सवर ऍडव्हरटायझिंग कुकीज (advertising cookies) सेव्ह करण्याआधी व्हिजिटर्सची पूर्वानुमती घेतली नव्हती. हेही वाचा - Trump Impeachment: डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेटकडून दिलासा, हिंसा भडकवल्याचा आरोप याशिवाय CNIL नं म्हटलं होतं, की गुगल आणि अमेझॉन इंटरनेट युजर्सना ही स्पष्ट माहिती देण्यात अपयशी ठरले, की दोन्ही फर्म्सना ऑनलाईन ट्रॅकर्सचा वापर कशाप्रकारे करायचा आहे. आणि या दोन कंपन्यांनी हेसुद्धा सांगितलं नव्हतं, की त्यांच्या फ्रेंच वेबसाईट्सचे व्हिजिटर्स कुकीज वापरण्याला नकार कसे देऊ शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात