मुंबई, 28 नोव्हेंबर : या आठवड्यात दोन IPO ओपन होणार आहेत. यामध्ये स्टार हेल्थ आयपीओ (Star Health IPO) आणि तेगा इंडस्ट्रीज आयपीओचा (Tega Industries IPO) यांचा समावेश आहे. या आयपीओचा एकूण आकार 7,868 कोटी रुपये आहे. स्टार हेल्थ आयपीओ उघडण्याची तारीख 30 नोव्हेंबर आहे आणि 2 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. Tega IPO 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान उघडेल. याशिवाय डीएमआर हायड्रोइंजिन आयपीओसाठी (DMR Hydroengine IPO) 29 नोव्हेंबर सोमवारपर्यंत अर्ज करता येतील.
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीमध्ये (Star Health and Allied Insurance Company) सुमारे 17.26 टक्के हिस्सा आहे. कंपनीने या IPO मधून सुमारे 7,249.18 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
स्टार हेल्थ आयपीओ
स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या IPO साठी बोली लावली जाऊ शकते. या IPO च्या लिस्टिंगची संभाव्य तारीख 10 डिसेंबर आहे. कंपनीचे एका लॉटमध्ये 16 शेअर्स असतील आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावता येईल. स्टार हेल्थ IPO चा प्राइस बँड 870 ते 900 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटसाठी 14,400 (900 x16) रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावण्यासाठी 1,87,200 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या आयपीओबाबत बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टार हेल्थ ही आरोग्य विमा मार्केटमधील सर्वात मोठी स्टँडअलोन हेल्थ इन्शुरन्स (SAHI) प्रदाता आहे. किरकोळ आरोग्य विभागात कंपनीचा 31 टक्के इतका मोठा बाजार हिस्सा आहे. कोरोना महामारीमध्ये (Corona Pendamic) विम्याबाबत जागरूकता वाढली आहे, पण त्यासोबतच दावेही वाढले आहेत, त्यामुळे कंपन्यांचे नुकसान झाले आहे. तज्ञांच्या मते, स्टार हेल्थ इन्शुरन्सचे समभाग सध्या ग्रे मार्केटमधील त्याच्या IPO जारी किमतीपेक्षा सुमारे 30 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्सचा GMP सतत कमी होत आहे.
राकेश झुनझुनवालांचा या स्टॉकमुळे 753 कोटींचा तोटा, तुमच्याकडेही आहे हा शेअर?
Tega Industries IPO
तेगा इंडस्ट्रीजचा IPO सुमारे 619.23 कोटी रुपयांचा आहे आणि तो 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. IPO साठी बोली लावण्यासाठी किंमत 443 ते 453 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे. म्हणजेच या इश्यूच्या माध्यमातून कंपनीचे प्रमोटर आणि भागधारक आपला हिस्सा विक्रीसाठी सादर करतील.
Tega Industries IPO साठी, गुंतवणूकदार लॉटमध्ये बोली लावू शकतील आणि एका लॉटमध्ये कंपनीचे 33 शेअर असतील. अशा प्रकारे गुंतवणूकदाराला IPO साठी बोली लावण्यासाठी किमान 14,949 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावण्यासाठी 1,94,337 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. तेगा इंडस्ट्रीजचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी लिस्टिंग केले जातील.
डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट
तेगा इंडस्ट्रीज IPO GMP
तेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम कालपर्यंत 240 रुपये होता. ग्रे मार्केटला टेगा इंडस्ट्रीजचे शेअर्स 693 रुपयांवर बंद होण्याची अपेक्षा आहे, जे IPO च्या जारी किमतीपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market