मुंबई, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात एकूण संख्याही तब्बल 2064 वर पोहोचली आहे.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 82 नवे रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. एकटा मुंबईत 82 पैकी 59 रुग्ण आढळले आहे. यात धारावी, कोळीवाडा परिसराचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्येही 12 रुग्ण आढळले आहे. मालेगावमध्ये गेल्या 48 तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
हेही वाचा -खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा
त्यामुळे मुंबई पाठोपाठ मालेगावही कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे. रविवारपर्यंत मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 31 वर होता. त्यातच गेल्या 24 तासांत 12 जणांची आणखी भर पडली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने प्रतिबंध घालण्यासाठी पावलं उचणार आहे.
रविवारी मालेगावात आढळले 28 रुग्ण
रविवारी मालेगावात तब्बल 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली . मात्र, कोरोनाला गांभीर्याने घेण्यास कोणीही तयार नाही. रोज मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून बाजारात गर्दी करत आहे. गर्दीला अंकुश लावण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर नागरिकांमध्ये कोरोना हा किती घातक आहे याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आहे त्या लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडत किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहे. त्यामुळे आता जर सर्वांनी मिळून कडक पाऊल नाही उचलले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तर पुण्यातही 3 रुग्ण आढळून आले आहे. तर ठाण्यात नवे 5 रुग्ण आढळले आहे. पालघरमध्ये 2 तर वसई विरारमध्ये 1 रुग्ण आढळला आहे.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8,933 वर
दरम्यान, देशात कोरोना विषाणूची 8,933 प्रकरणांची नोंद झाली आहेत आणि 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 981 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
हेही वाचा -'आम्हाला वाचवा नाहीतर...', पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 918 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण प्रकरणांची संख्या 8,447 आहे आणि मृतांची संख्या 273 आहे. आतापर्यंत 765 लोक बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे.
संपादन - सचिन साळवे