श्रीनगर, 7 मे : जगभरात फुटबॉलची (Football) क्रेझ आहे. पेले आणि मॅराडो (Pele and Marado) या खेळाडूंच्या काळापासून लोकांना फुटबॉलची आवड लागली आहे. आता रोनाल्डो आणि मेस्सी यांचे चाहते भारतातही वाढत आहेत. अनेक तरुण सध्या फुटबॉलमध्ये करिअर करण्याचा त्यांचा विचार आहे. परंतु, प्रत्येकाचे कौशल्य सारखे नसते. त्यामुळे त्यांना हवी तशी ओळख मिळत नाही. मात्र, एक तरुण (Kashmiri Boy Football Video) त्याच्या टॅलेंटमुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे आणि भारतीय फुटबॉलपटू भाईचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) सारख्या खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे. काश्मिरी तरुण शाह हुजैबला (Shah huzaib) फुटबॉलची खूप आवड आहे आणि तो नेहमीच त्याच्या अप्रतिम कौशल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या कौशल्यामुळे त्याने जोश टॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांना प्रेरित केले आहे. तसेच तो इंडियाज गॉट टॅलेंटच्या सीझन 9 (India’s Got Talent Season 9) मध्ये देखील दिसला आहे. भाईचुंग भुतिया यानेही शाह हुजैबचे कौतुक केले आहे. अलीकडेच त्याने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ (Kashmir boy football tricks) शेअर केला आहे. ज्यामध्ये तो फुटबॉलसोबत अप्रतिम ट्रिक्स वापरताना दिसत आहे. बहिणीशी लग्न केल्यानं चर्चेत आले होते ‘हे’ क्रिकेटर्स, भारतीय क्रिकेटपटूचाही समावेश फुटबॉलसोबत वेगवेगळ्या प्रकारे खेळताना दिसत आहे शाह हुजैब व्हिडिओमध्ये शाह हुजैब फुटबॉलसोबत वेगवेगळ्या प्रकारे खेळताना दिसत आहे. कधी तो कड्यांतून बॉलपास करताना दिसत आहे तर कधी दुरूनच बॉल बादलीत टाकताना दिसतोय, कधी तो बॉल डोक्यावर घेऊन उभा राहिलेला असतो तर कधी घराच्या छतावरून येणाऱ्या बॉलला मारून गोल करताना करताना दिसत आहे. या सर्व ट्रिक्स अतिशय आकर्षक दिसत आहेत आणि सोशल मीडियावर लोक त्याच्या कौशल्याचे कौतुक देखील करत आहेत. लोकांनी व्हिडिओवर केल्या खूप कमेंट्स शाह हुजैबचा हा व्हिडिओ 37 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ रिट्विट करून कमेंट केल्या आहेत. एका महिलेने लिहिले, ‘शाह तिच्यासाठी सुपरस्टार आहे’. एक व्यक्ती त्याच्या व्हिडिओपासून इतका प्रभावित झाला की त्याने शाह हुजैबला फुटबॉलमध्येच करिअर करण्याचा सल्ला दिला. एका व्यक्तीने सांगितले की, ‘त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू बनण्याची क्षमता आहे’. तर एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तो अशा ट्रिक्स अतिशय सुंदरपणे सादर करतो.’ शाह हुजैबचा हा व्हिडिओ ग्रीनबेल्ट आणि रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष एरिक सोल्हेम (President Of The Greenbelt And Road Institute Eric Solheim) यांनीही रिट्विट केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.