मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बहिणीशी लग्न केल्यानं चर्चेत आले होते ‘हे’ क्रिकेटर्स, भारतीय क्रिकेटपटूचाही समावेश

बहिणीशी लग्न केल्यानं चर्चेत आले होते ‘हे’ क्रिकेटर्स, भारतीय क्रिकेटपटूचाही समावेश

अनेक क्रिकेटपटूंनी (Cricketers) त्यांच्या बहिणींशी लग्न केली आहेत. काहींच्या पत्नी या नात्यात त्यांच्या बहिणी लागत होत्या. मुख्य म्हणजे यामध्ये भारताच्याही एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. अशाच काही स्टार क्रिकेटपटूंची नावं आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेक क्रिकेटपटूंनी (Cricketers) त्यांच्या बहिणींशी लग्न केली आहेत. काहींच्या पत्नी या नात्यात त्यांच्या बहिणी लागत होत्या. मुख्य म्हणजे यामध्ये भारताच्याही एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. अशाच काही स्टार क्रिकेटपटूंची नावं आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेक क्रिकेटपटूंनी (Cricketers) त्यांच्या बहिणींशी लग्न केली आहेत. काहींच्या पत्नी या नात्यात त्यांच्या बहिणी लागत होत्या. मुख्य म्हणजे यामध्ये भारताच्याही एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. अशाच काही स्टार क्रिकेटपटूंची नावं आज आपण जाणून घेणार आहोत.

पुढे वाचा ...

मुंबई, 7 मे : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) गेल्या वर्षी त्याच्या चुलत बहिणीशी साखरपुडा केल्याच्या वृत्तानंतर चांगलीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. बहिणीशी लग्न करणार म्हणून बाबरला चांगलंच ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. बाबरचा साखरपुडा झाला असून, तो त्याच्या चुलत बहिणीशी लग्नदेखील करणार आहे. दरम्यान, नात्याने बहीण असणाऱ्या मुलीशी लग्न करणारा बाबर एकटाच नाही. अनेक क्रिकेटपटूंनी (Cricketers) त्यांच्या बहिणींशी लग्न केली आहेत. काहींच्या पत्नी या नात्यात त्यांच्या बहिणी लागत होत्या. मुख्य म्हणजे यामध्ये भारताच्याही एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. अशाच काही स्टार क्रिकेटपटूंची नावं आज आपण जाणून घेणार आहोत.

मुस्तफिझूर रहमान आणि सामिया परवीन

बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान हा क्रिकेटमधील सर्वोत्तम बॉलरपैकी एक आहे. त्याची बॅक ऑफ हँड डिलीव्हरी आणि स्लो कटरमुळे तो ओळखला जातो. त्याची वेगळी शैली हीच त्याची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर मुस्तफिझूरने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मामाची मुलगी सामिया परवीन (Samia Parveen) हिच्याशी लग्न केलंय. सामिया परवीन ही ढाका विद्यापीठात सायकॉलॉजीची विद्यार्थिनी आहे. या संदर्भात क्रिकेट अड्डाने वृत्त दिलंय.

शाहिद आफ्रिदी आणि नादिया

पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shaheed Afridi) कधी मैदानावर केलेल्या कृतींमुळे तर कधी मैदानाबाहेर केलेल्या कृतींमुळे चर्चेत राहतो. आफ्रिदीने आपल्या मामाची मुलगी म्हणजे मामेबहीण नादिया हिच्याशी लग्न केलंय. जेव्हा आफ्रिदीने नादियाशी लग्न करण्याची घोषणा केली होती, तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. त्याचं कारण आफ्रिदीचं वयदेखील होतं. आफ्रिदी अवघ्या 20 वर्षांचा होता, जेव्हा त्याने नादियाशी लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. आफ्रिदी आणि नादियाने (Nadia) 22 ऑक्टोबर 2000 रोजी लग्न केलं, दोघंही आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांना पाच मुली असून, त्यांची मोठी मुलगी पाकिस्तानी क्रिकेटचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी लग्न करणार असल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं.

डेव्हिड वॉर्नरच्या 'त्या' वागण्यामुळे त्याला वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला, वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत

या यादीत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) नावाचाही यात समावेश आहे. सेहवागने आपल्या बॅटिंगने देशासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तसंच तो सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून, त्याची मतं व्यक्त करत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता कॉमेंट्री करून लोकांचं मनोरंजन करतो. सेहवागच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास वयाच्या सातव्या वर्षापासून त्याला त्याची दूरची चुलत बहीण आरती (Arti) अहलावत आवडायची. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दूरचे चुलत भाऊ आणि बहीण असल्याने त्यांना घरच्यांचा तीव्र विरोध झाला. पण अखेर दोघांनाही कुटुंबीयांची समजूत काढण्यात यश आलं आणि 22 एप्रिल 2004 रोजी त्यांनी लग्न केलं. वीरेंद्र आणि आरती यांना दोन मुलं आहेत.

नात्याने भाऊ आणि बहीण लागत असूनही त्यांनी लग्न केलं होतं, त्यामुळे या तीन जोड्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या.

First published:

Tags: Shahid Afridi, Virender sehwag