बंगळुरू, 10 जून: एका भाजप आमदाराच्या (BJP MLA’s daughter) मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वाहतूक पोलिसांशी तिनं घातलेला वाद दिसून येत आहे. काय आहे नेमकी घटना जाणून घेऊया. कर्नाटकचे भाजप आमदार अरविंद निंबावली यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती वाहतूक पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. ही बाब गुरुवारची आहे. जेव्हा बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या अरविंद निंबावली यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना वाहतूक पोलिसांनी सिग्नल तोडल्यामुळे थांबवलं होतं. पक्ष्याला वाचवण्यासाठी कारमधून उतरलेल्या दोघांचा टॅक्सीच्या धडकेत मृत्यू; सी लिंकवरील दुर्घटनेचा Live Video मात्र चूक मान्य करण्याऐवजी आमदाराच्या मुलीनं पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली आणि तेथे उपस्थित काही पत्रकार आणि कॅमेरामन यांच्याशीही गैरवर्तन केल्याचा आरोप केला. एवढं करूनही पोलिसांनी आपली कारवाई थांबवली नाही आणि पुरावे दाखवत 10,000 रुपयांचा दंड वसूल केला. व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप आमदाराची मुलगी मला आता जायचे आहे, असे म्हणताना दिसत आहे. गाडी पकडू नका. माझ्यावर ओव्हरटेकिंगचे केस टाकू शकत नाही. ही आमदाराची गाडी आहे. आम्ही रॅश ड्रायव्हिंग केलेले नाही. माझे वडील अरविंद निंबावली आहेत.
So BJP MLA Limabavali’s daughter was caught jumping the signal and allegedly claiming “ this is MLAs car”.https://t.co/Iig08rxawg
— Lavanya Ballal Jain (@LavanyaBallal) June 9, 2022
वाद सुरू असताना मुलीने घरी जाण्याचंही बोलून दाखवले आणि दंड भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचंही सांगितले. मात्र शेवटी त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मैत्रिणीनं दंड भरला आणि त्यांना सोडून देण्यात आलं. आमदाराच्या मुलीची वाहतूक पोलिसांशी हुज्जत, काय आहे संपूर्ण कहाणी हे संपूर्ण प्रकरण गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास आहे. जेव्हा वाहतूक पोलिसांनी केएससीए स्टेडियमजवळ क्वीन्स रोडवरून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कार मिन्स्क स्क्वेअरमधील राजभवन रोडवर दाखल झाली होती. तोपर्यंत गाडीनं अनिल कुंबळे सर्कलजवळ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनालाही ओव्हरटेक केले होते. कारमध्ये सुमारे 20-25 वर्षे वयोगटातील दोन महिला आणि दोन पुरुष होते. एका तरुणीनं खाली उतरून पोलिसांना स्पष्टीकरण मागितलं. त्यावर पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, सिग्नल तोडल्यानं गाडी थांबवली आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं ही माहिती मोबाईलवरून दाखवली. या कारवर 13 गुन्हे दाखल असून दंड भरला नसल्याचं समोर आले. सात प्रकरणे चुकीच्या पार्किंगची आणि सहा वाहतूक सिग्नल तोडण्याची होती. चुकीच्या पार्किंगसाठी 1,000 रुपये दंड आकारला जातो, तर सिग्नल जंपिंगसाठी 500 रुपये दंड आकारला जातो. एसीपीच्या जीपला ओव्हरटेक केल्यामुळेच गाडी थांबवण्यात आली, असा युक्तिवाद तरुणीनं केला. काही टीव्ही चॅनेल्सच्या कर्मचाऱ्यांनी राजभवनासमोर या घटनेचं शूटिंग सुरू केलं. तेच फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाद घालणाऱ्या महिलेचं नाव रेणुका निंबावली असं आहे. MHADA मास्टर लिस्टसाठी आतापर्यंत दीड हजार अर्ज, अटी-शर्थींसह नवीन मुदतवाढ पोलिसांच्या जीपला ओव्हरटेक करण्याबाबत विचारले असता, एसीपीच्या गाडीला ओव्हरटेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार का? ही आमदाराची गाडी आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, कारने जीपला डाव्या बाजूने ओव्हरटेक केले, तेव्हा ती मुलगी म्हणाली, आम्ही रॅश ड्रायव्हिंग केले नाही. पोलिसांच्या वाहनाला ओव्हरटेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार का?