मुंबई, 10 जून: मुंबईतील (Mumbai's Bandra Worli Sea Link) वांद्रे वरळी सी लिंकवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. वरळी सी लिंकवर भीषण अपघात घडला आहे. या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ (heartbreaking video) समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान घटना जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टॅक्सी चालकानं धडक दिल्यानंतर दोघेही हवेत उडाले आणि दूरवर जाऊन पडले. या अपघातात अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Corona Virus In India: देशात येणार Corona ची चौथी लाट?, टॉप आरोग्य तज्ज्ञांनी दिलं उत्तर
अमर मनीष जरीवाला हे प्राणी आणि पक्ष्यांबाबत अत्यंत संवेदनशील होते आणि हीच संवेदनशीलता त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली, असे म्हटले जाते. अमर यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आपल्याच कारने जखमी झालेल्या घारीला वाचवण्यासाठी गाडी थांबवली होती. अमर मनीष जरीवाला यांनी त्यांची कार थांबवली आणि चालक श्याम सुंदर कामत यांच्यासह घारीला वाचवण्यासाठी खाली उतरले.
अमर आणि त्यांचा ड्रायव्हर खाली उतरला असता दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या टॅक्सीने त्यांना धडक दिली. टॅक्सीची धडक इतकी जोरदार होती की अमर आणि चालक श्याम सुंदर हे दोघे हवेत फेकले गेले. त्यानंतर दोघंही दोन दिशेला जाऊन पडले. अमर मनीष जरीवाला याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Never get down and walk like this on Bandra Worli Sea Link!
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. फुटेज समोर आल्यानंतर आता वरळी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धडक देणाऱ्या टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अमर मनीष जरीवाला पीएनसी रोडवर असलेल्या सोसायटीत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते काही कामानिमित्त मालाडला जात होते. मालाडला जाण्यासाठी अमर यांनी सी लिंकचा मार्ग निवडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.