जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आणखी एका जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याला दिली तिलांजली; दुकानदाराला चापट मारल्याचा VIDEO VIRAL

आणखी एका जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याला दिली तिलांजली; दुकानदाराला चापट मारल्याचा VIDEO VIRAL

आणखी एका जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याला दिली तिलांजली; दुकानदाराला चापट मारल्याचा VIDEO VIRAL

शाजापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी (Shajapur Collector) एका दुकानदाराला जोरानं चापट मारताना दिसत आहेत. कर्फ्यूदरम्यान नियमांचं उल्लंघन केलेल्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई न करता मंजूषा विक्रांत यांनी आपल्याकडील अधिकारांचा गैरवापर करत त्याला थेट चापट मारली.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 24 मे: छत्तीसगडच्या सूरजपूरमधील जिल्हाधिकाऱ्यानं रस्त्यावरच एका तरुणाचा मोबाईल फोडत त्याला चापट मारली होती. हे प्रकरण ताज असतानाच अशीच आणखी एक घटना आता मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. यात शाजापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी (Shajapur Additional Collector) एका दुकानदाराला जोरानं चापट मारताना दिसत आहेत. कर्फ्यूदरम्यान नियमांचं उल्लंघन केलेल्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई न करता मंजूषा विक्रांत यांनी आपल्याकडील अधिकारांचा गैरवापर करत त्याला थेट चापट मारली. कोरोना कर्फ्यूदरम्यान (Corona Curfew) या दुकानदारानं आपला दुकान उघडलं. मात्र, प्रशासनाची टीम याठिकाणी दाखल होताच त्यानं आपल्या बचावासाठी सांगितलं, की दुकानाच्या आतमध्येच माझं घर आहे. टीमनं आतामध्ये जाऊन पाहणी केली असता तो खोटं बोलत असल्याचं समोर आलं. याच गोष्टीवरुन मंजूषा विक्रांत यांना राग अनावर झाला आणि त्यांनी अल्पवयीन मुलाला चापट मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करुन दुकान उघडणं चुकीचं आहेच. मात्र, त्यावर अशाप्रकारची कारवाई करणंदेखील चुकीचंच आहे.

जाहिरात

काहीच दिवसांपूर्वी अशीच एक घटना सूरजपूरमध्येही घडली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला भररस्त्यात चापट मारली होती. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संबंधित अधिकाऱ्याला पदावरुन काढून टाकलं होतं. आता या अधिकाऱ्याविरोधातही अशीच कडक कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात