मराठी बातम्या /बातम्या /मनी /

टाटांचं मोठं मन! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार भक्कम आधार

टाटांचं मोठं मन! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार भक्कम आधार

कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) अनेक कुटुंबांची घडी पार विस्कटून गेली आहे. टाटा स्टीलने (Tata Steel) या काळात सामाजिकतेचं भान जपत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 मे: कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) देशाची घडी पार विस्कटून गेली आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने अनेक कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. या अडचणीच्या प्रसंगात त्यांना मदत करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या वेगवेगळे निर्णय घेत आहेत. सामाजिकतेचं भान जपण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या टाटा स्टीलने (Tata Steel) संकटात सापडलेल्या या कुटुंबीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय वाचून तुम्हाला पुन्हा एकदा टाटांचा अभिमान नक्की वाटणार आहे. 'कोणत्याही कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना त्या कर्मचाऱ्याच्या 60 वर्षापर्यंत (निवृत्तीपर्यंत) संपूर्ण पगार देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर त्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण सोय कंपनीतर्फे करण्यात येईल. तसेच त्यांना वैद्यकीय आणि निवासाची सूविधा देखील या कालावधीमध्ये मिळेल,' अशी घोषणा टाटा स्टीलने केली आहे. त्याचबरोबर एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला तर त्याच्या मुलांच्या भारतामधील पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च देखील कंपनी व्यवस्थापन करणार आहे. कंपनीच्या निवेदनात काय? 'कंपनीचे कर्मचारी आणि भागधारक यांच्या हितासाठी कंपनी व्यवस्थापन नेहमीच कार्यरत आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात  देखील टाटा स्टील सर्व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वी देखील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावलं उचलली आहेत.' असे कंपनीने या विषयावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे. बजाज कंपनीचीही घोषणा यापूर्वी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने देखील असा निर्णय घेतला आहे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षासाठी त्यांच्या कंपनीकडून पगार दिला जाईल. शिवाय या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे. Corona: रुग्णसंख्येत घट मात्र मृतांचा आकडा 'जैसे थे', मृत्यूदराच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर बजाज ऑटोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना विविध उपाययोजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत राहू. ही मदत केवळ लसीकरण केंद्र यापुरती मर्यादित नाही तर कोविड केअर सर्व्हिस, अ‍ॅक्टिव्ह टेस्टिंग आणि हॉस्पिटलायझेशनसाठीही मदत केली जात आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Ratan tata, Tata group

पुढील बातम्या