जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावर दुपारी निकाल, तोपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनमध्ये!

जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावर दुपारी निकाल, तोपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनमध्ये!

कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांचा निर्णय राखून ठेवला आहे. दुपारून निर्णय येणार आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहे.

कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांचा निर्णय राखून ठेवला आहे. दुपारून निर्णय येणार आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहे.

कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांचा निर्णय राखून ठेवला आहे. दुपारून निर्णय येणार आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहे.

  • -MIN READ Thane,Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 12 नोव्हेंबर : हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करून ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांचा निर्णय राखून ठेवला आहे. दुपारून निर्णय येणार आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याचे आदेश दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टात हजर केले  आहे. लोकअदालत असल्यानं पहिल्या सत्रातच आव्हाड यांची सुनावणी झाली. आव्हाड यांचे वकील प्रशांत कदम यांनी जोरदार युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहे. जाणीवपुर्वक दाखल केले गेले कलम ७ हा वाढवू शकत नाही कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आलीये जो महाराष्ट्रात लागू होत नाही. मी स्वतःहून चौकशी करता आलो होतो. तपासात पूर्ण सहकार्य केले. सेक्शन ७ ठाणे सिटीत लावता येत नाही तसा १९३२ साली कायद्यात म्हटलंय. अटक ही पूर्ण पणे बेकायदेशीर आहे. अटक करताना कोणताही प्रोटोकॅाल पाळला गेला नाही’ असा दावाही कदम यांनी केला. तर सरकारी वकिलांनी जितेंद्र आव्हाड आणि इतर १२ कार्यकर्त्यांची ७ दिवसांकरता पोलीस कोठडी मागितली. तर जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह सर्व 12 आरोपींना परत पोलीस ठाण्यात आणार आहे.   कोर्टाकडून सूचना आल्याने पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे आव्हाड यांना सेफ कस्टडी अर्थात पोलीस स्टेशनमध्ये थांबावे लागणार आहे. दुपारी निर्णय दिला जाणार आहे. तोपर्यंत त्यांनी पोलीस कोठडीतच थांबावे लागणार आहे. (नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी) दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी  नातेवाईंकांशी बोलताना नवीन खुलासा केला.  चाणक्याचे सतत पोलिसांना फोन येत आहे. फोनवरुन पोलिसांवर दबाव टाकला जात आहे.  जेवण पण मिळू नये करता प्रयत्न केले जात होते, असा आरोप आव्हाड यांनी केला. त्यामुळ  तो चाणक्य कोण? अशी आव्हाड यांच्या गोटात जोरदार चर्चा सुरू झली आहे. (सेनेला रोखण्यासाठी केसरकर-राणे आले एकत्र, सिंधुदुर्गात ‘या’ निवडणुकीत दिली विजयी सलामी) तपासात सहकार्य केलं नाही, उत्तरं देण्यास टाळाटाळ, या चित्रपटावर आक्षेप होता तर योग्य कायदेशीर दाद का नाही मागितली? याचा अर्थ हेतू हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न आहे का? राज्यातील अनेक सिनेमागृहात सुरू असलेला हा सिनेमा, बंद पाडण्याचं,कारस्थान आहे का? याचा तपास करायचा आहे. प्रेक्षकगृहातील प्रेक्षकांची सुरक्षा धोक्यात आणण्याचे कटकारस्थान आहे, त्याचा सखोल तपास करायचा आहे, अशी मागणी पोलिसांनी केली. तसंच, मॉलमधील चित्रपटगृह चालक यांचे व्यावसायिक नुकसान केले आहे. आरोपींवर इतर गुन्ह्यांचीही नोंद आहे. राजकीय पक्षाचे नेते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यानं, हा गुन्हा करण्यामागील मानसिकता काय ? याचा तपास करायचा आहे, असंही पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतली आणि निर्णय राखून ठेवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात