जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी

नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी

नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी

नाशिक जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत सगळं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे, कारण आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 12 नोव्हेंबर : नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातलं चित्र बदललं. नाशिकचे आमदार आणि मंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झाले, पण आता बाळासाहेबांच्या शिवसेनेतही आलबेल नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार सुहास कांदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या सुटकेनंतर जिल्ह्यातल्या उद्धव ठाकरे पक्षाला उभारी मिळाली आहे. संजय राऊतांची जेलमधून सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी शिंदेंना साथ दिली, तर दादा भुसेदेखील शिंदेंसोबत गेले. एक आमदार आणि एक मंत्री एवढं शिवसेनेचं नाशिक जिल्ह्यात बळ होतं, पण दोघांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना फटका बसला, पण राऊतांच्या सुटकेनंतर झालेल्या जल्लोषामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘राऊतांना मानणारा शिवसेनेमध्ये एक वर्ग आहे. हे काही झाकून लपून नाही. नांदगावच कशाला ज्यांना आनंद झाली त्यांनी आनंद व्यक्त केला, आपण टीव्हीवर बघितलं,’ असं दादा भुसे म्हणाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीला सुहास कांदे उपस्थित नव्हते. तसंच मागच्या दीड महिन्यांपासून त्यांची बैठकीला उपस्थिती नाही, याबाबत दादा भुसे यांना विचारण्यात आलं. नाराजीचा विषय नाही, आम्ही सगळे एकदिलाने काम करत आहोत, असं दादा भुसे यांनी सांगितलं. नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात