मुंबई, 18 एप्रिल : रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) साठा सापडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Polie) ब्रुक फार्माच्या (bruck pharma daman) संचालकाला चौकशीला ताब्यात घेतले होते. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी शितयुद्ध पेटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी एका वृतपत्राचे कात्रणच ट्वीट केले आहे. यात ब्रुक फार्मा कंपनीवरच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ब्रुक फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे, असा पुरावाच आव्हाड यांनी दिला आहे.
तसंच, ‘महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारखं माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल’ असा टोलाही आव्हाड यांनी भाजपला लगावला. गृहमंत्री वळसे पाटलांनी दिले कारवाईचे संकेत दरम्यान, मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, 50 हजार रेमडेसीवीर येत आहे. त्याची चौकशी ब्रुफ्र फार्मा अधिकारी यांनी बोलवले होते, असा खुलासा वळसे पाटील यांनी केला. ‘या’ देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर ज्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याला चौकशीला बोलावले होते. तेव्हा फडवणीस आणि दरेकर यांनी हस्तक्षेप तिथ केला. पोलीस चौकशी करायची असेल तर कोणास ही बोलवू शकतो. शासकीय कामात हस्तक्षेप त्यांनी केला पोलिस दबाव टाकणे योग्य नाही, अशी टीका वळसे पाटील यांनी केली. ‘फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा का याची माहिती घेत आहोत, या संदर्भात चौकशी करून भूमिका घेतली जाईल, असं सूचक विधान वळसे पाटील यांनी केले.