Home /News /news /

VIDEO: रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! या शहरात पोलीस अधीक्षकांच्या सूचना

VIDEO: रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! या शहरात पोलीस अधीक्षकांच्या सूचना

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार रात्रीच्या संचारबंदी वेळेमध्ये जे नागरिक रस्त्यावर बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांची त्याच ठिकाणी रॅपिड ॲटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) करण्यास भुसावळमध्ये सुरुवात करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
जळगाव, 14 एप्रिल: राज्यात 14 एप्रिल 2021 च्या रात्रीपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी (Coronavirus Lockdown in Maharashtra)  लागू करण्यात येत आहे. आजपासून पंधरा दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यावरही निर्बंध (Night Curfew) होते. तरी देखील कोरोनाची (COVID-19) भीती न बाळगता बाहेर पडणारे नागरिक सर्रास अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. दरम्यान भुसावळमध्ये (Bhusawal) पोलिसांनी यावर नामी शक्कल लढवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार रात्रीच्या संचारबंदी वेळेमध्ये जे नागरिक रस्त्यावर बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांची त्याच ठिकाणी  रॅपिड ॲटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) करण्यास भुसावळमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. भुसावळ नगरपालिकेतील पालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचारबंदीच्या (People Roaming around during Curfew) कालावधीमध्ये जे नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची  रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे. (हे वाचा-कोरोना लसीकरणात भारताचं मोठं पाऊल; विदेशी कोरोना लशींना मिळणार Fast Track मंजुरी) याठिकाणी तैनात असणारे पोलीस कर्मचारी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासाठी थांबवत असल्याचं चित्र भुसावळमध्ये पाहायला मिळाल. पाहा व्हिडीओ- यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कक्षामध्ये भरती केले जाणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील आणि इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही हा यामागचा उद्देश आहे. मंगवाळी रात्री उशिरापर्यंत 50 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून सुदैवाने त्यामध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती भुसावळ नगरपालिका हॉस्पिटलचे डॉ. तोसिफ खान यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या या आदेशामुळे नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर तर आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Jalgaon

पुढील बातम्या