मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

उद्धव ठाकरेंबाबत 'ती' शिफारस राज्यपालांना पाळणं बंधनकारक, काय म्हणाले घटना तज्ज्ञ

उद्धव ठाकरेंबाबत 'ती' शिफारस राज्यपालांना पाळणं बंधनकारक, काय म्हणाले घटना तज्ज्ञ

राज्यपालांनी असं केले नाही तर मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे घटनातज्ज्ञांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी असं केले नाही तर मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे घटनातज्ज्ञांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी असं केले नाही तर मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे घटनातज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पुणे, 26 एप्रिल: राज्यात कोरोनाचं संकट असताना राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करावे, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, राज्यपालांना ही शिफारस पाळणे बंधनकारक असल्याचं मत घटना तज्ज्ञ प्रा.उल्हास बापट यांनी 'News18 लोकमत'शी बोलतान व्यक्त केलं. राज्य घटनेच्या 159 कलमाखाली घटनेशी बांधील राहील अशी शपथ राज्यपाल घेत असतात आणि घटनेच्या 163 व्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळ हे राज्यपालांना शिफारस करू शकते. ही शिफारस राज्यपालांना पाळणे बंधनकारक असते, असं घटना सांगते, असं प्रा.उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. हेही वाचा..कोरोना विरुद्ध लढतांना भडकविणाऱ्यांपासून सावध राहा – मोहन भागवत सहा महिन्यांत एखादा सदस्य निमंत्रितच राहिला तर त्याचे मंत्रिपद जाते आणि मुख्यमंत्री असेल तर सहा महिन्यांनी मंत्रिपद जाते. सगळं सरकारच बरखास्त होते. त्यामुळे सहा महिन्यांत निवड व्हायला हवी, आता या आधीची परिस्थिती असती तर निवडणूक झाली असती. मात्र आताची परिस्थती अभूतपूर्व आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून विधान परिषदेत असलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्यांमार्फत उद्धव ठाकरे यांची निवड होऊ शकते. त्यात काही अडचण नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाने शिफारस केली असल्याने राज्यपालांना ही नियुक्ती करणे बंधनकारक आहे. हेही वाचा..24 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू; मुंबई-पुण्यानंतर ग्रामीण भागातही पसरतोय कोरोना ...तर राज्यात लागू शकते राष्ट्रपती राजवट मात्र राज्यपालांनी असं केले नाही तर मग राष्ट्रपती राजवट लागू शकते असे प्रा.उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत असे करणे परवडणार नाही. तसं केलं तर हे घटनात्मक दृष्ट्या अनैतिक ठरेल, असे प्रा.उल्हास बापट यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्वरित मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर सही करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मान्यता देणे आवश्यक आहे. संपादन- संदीप पारोळेकर
First published:

पुढील बातम्या