मुंबई, 26 एप्रिल : आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याची सकारात्मक माहिती दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. आज पुणे महापालिका क्षेत्रातील जळगाव येथे 2 , सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील 12, पुणे महापालिका क्षेत्रातील जळगाव येथे 2 , सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 1 लाख 16 हजार 345 रुग्णांची तपासणी केली असून त्यात एक लाख सात हजार 519 रुग्णांचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 8668 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या 604 कंटेनमेंट झोन असून 1603 सर्वेक्षण पथकं काम करत आहे. मुंबईत आज गेल्या 24 तासात 358 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 5407 कोरोनाबाधित रुग्ण सापडली आहेत. काल मुंबईत 5049 रूग्ण होते. मुंबईनंतर सर्वाधित रुग्ण पुण्यात सापडत आहेत. पुण्यात आणखी 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार ससूनमधील कोरोना मृतांची संख्या 55 वर गेली असून पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 75 वर गेला आहे. ठाण्यातही कोरोना बाधितांचा आकडा 200 च्या पार गेला आहे. आज ठाण्यात 17 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 209 करोना बाधित आहेत. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 440 नवीन रुग्ण दाखल झाले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार सध्या राज्यात एकूण 8068 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज 112 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1188 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. मुंबई महापालिकेत 5407 एकूण रुग्ण झाले असून आतापर्यंत 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संबंधित - GOOD NEWS : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले दुप्पट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.