मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IPL च्या खिलाडी हरप्रितची 'खिलाडी' अक्षयवरील कमेंट Viral, म्हणाला, 'पैशासाठी पगडी घालत नाही'

IPL च्या खिलाडी हरप्रितची 'खिलाडी' अक्षयवरील कमेंट Viral, म्हणाला, 'पैशासाठी पगडी घालत नाही'

हरप्रित ब्रारनं अक्षय कुमारच्या संदर्भानं केलंलं हे ट्वीट काही दिवसांपूर्वीचं आहे. पण तो चर्चेत आल्यानं आता ते व्हायरल होत आहे.

हरप्रित ब्रारनं अक्षय कुमारच्या संदर्भानं केलंलं हे ट्वीट काही दिवसांपूर्वीचं आहे. पण तो चर्चेत आल्यानं आता ते व्हायरल होत आहे.

हरप्रित ब्रारनं अक्षय कुमारच्या संदर्भानं केलंलं हे ट्वीट काही दिवसांपूर्वीचं आहे. पण तो चर्चेत आल्यानं आता ते व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली, 1 मे : आयपीएल (IPL) ही क्रिकेटपटूला एका रात्रीत स्टार बनवणारी स्पर्धा आहे असं म्हटलं जातं. पंजाब विरुद्ध बंगळुरूच्या (PB vs RCB) सामन्यानंतर ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण या सामन्यानंतर तीन विकेट घेणारा हरप्रित ब्रार (Harpreet Brar) खरंच स्टार बनला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या मैदनावर हिरो ठरलेल्या हरप्रितनं यापूर्वीच अक्षय कुमारला (Akshay Kumar) शेतकरी आंदोलनाच्या (Farmer protest) मुद्द्यावरून सुनावलं आहे. मी पैशासाठी पगडी (Turban) परिधान करत नाही, असं हरप्रितनं म्हटलं होतं.

(वाचा-IPL 2021 : कृणाल पांड्या पुन्हा वादात, सहकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप, Video Viral)

शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये बंगळुरुच्या फलंदाजीचं कंबरडं मोडण्याचं काम हरप्रितनं केलं होतं. त्यानं कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हीलियर्स यांना बाद करत बंगळुरूला पराभूत करण्यात मोठा वाटा उचलला होता. या सामन्यानंतर हरप्रित हिरो बनला आहे. यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये केवळ 3 सामने खेळले होते. पण या सामन्यात त्यानं केलेल्या कामगिरीनं सर्वांना आवाक केलं आहे. या सामन्यानंतर साहजिकच संपूर्ण देशाचं लक्ष हरप्रितकडं गेलं. त्यामुळं आता त्याच्या काही दिवसांपूर्वीच्या एका ट्विटची चर्चा होत आहे. या ट्विटद्वारे त्यानं अक्षय कुमारला टोला लगावला आहे. मात्र हरप्रित चर्चेत आल्यानंतर आता हे ट्विट व्हायरल होत आहे.

(वाचा-RCB च्या खेळाडूकडून कराराचं उल्लंघन, विराटचा उल्लेख असलेला तो VIDEO डिलीट)

हरप्रितचं चर्चेत असलेलं हे ट्विट 25 एप्रिलचं आहे. एका चाहत्यानं हरप्रितला तू सिंग इज ब्लिंग मधला अक्षय कुमार दिसतो असं म्हटलं. मात्र या कमेंचा फोटो ट्विट करत त्यावर हरप्रितनं पैशांसाठी पगडी परिधान करत नाही अशी पोस्ट केली. विशेष म्हणजे यासोबत हरप्रितनं #isupportfarmers असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.

हरप्रितनं केलेल्या या पोस्टची सध्या चर्चा होत असली तरी त्यानं प्रसिद्धीसाठी किंवा टीका करायची म्हणून असं केलेलं नाही. तर विविध सामाजिक मुद्द्यांवर त्यानं ट्विटरवर भावना मांडल्याचं पाहायला मिळालं आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही हरप्रितनं नेहमी पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळालं आहे.

क्रिकेटच्या मैदानावर गवसलेल्या या नव्या हिरोला सामाजिक भान असल्याचंही पाहायला मिळालं आहे. आता या यशाच्या मार्गावर तो किती पुढं जाणार हेच पाहावं लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Ipl, Punjab kings