नवी दिल्ली, 1 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) पुन्हा वादात सापडला आहे. आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) बडोद्याकडून खेळताना कृणाल पांड्या आणि सहकारी दीपक हुडा (Deepak Hooda) यांच्यातही वाद झाला होता, या वादानंतर हुडाचं बडोदा क्रिकेट असोसिएशनने वर्षभरासाठी निलंबन केलं. यानंतर कृणाल पांड्याचे वडील हिमांशू पांड्या यांचं निधन झालं, त्यामुळे कृणालनेही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अर्ध्यात सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात कृणाल पांड्याच्या वर्तणुकीमुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 171 रनवर रोखलं.
राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात मुंबईने इशान किशनला (Ishan Kishan) डच्चू दिला, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कृणाल बॅटिंगला आला. या मोसमात संघर्ष करणाऱ्या कृणालला या मॅचमध्ये सूर गवसला. कृणालने 23 बॉलमध्ये 39 रनची खेळी केली. क्विंटन डिकॉकसोबतही त्याने महत्त्वाची पार्टनरशीप केली.
बॅटिंग करत असताना कृणाल पांड्याने मुंबईचा 12वा खेळाडू अनुकूल रॉयसोबत (Anukul Roy) गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. कृणालने मैदानात आलेल्या अनुकूल रॉयकडे मॉईस्चरायजर फेकून दिला. कृणाल पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी कृणाल पांड्याचा मुंबई इंडियन्सच्या फिल्डर्सवर भडकल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
— pant shirt fc (@pant_fc) May 1, 2021
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा विजय झाल्यानंतर आता शनिवारी त्यांचा सामना चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिला सामना गमावल्यानंतर पुढच्या लागोपाठ 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने 6 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यातला सामना खेळवला जाणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम पहिल्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Krunal Pandya