मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : RCB च्या खेळाडूकडून कराराचं उल्लंघन, विराटचा उल्लेख असलेला तो VIDEO डिलीट

IPL 2021 : RCB च्या खेळाडूकडून कराराचं उल्लंघन, विराटचा उल्लेख असलेला तो VIDEO डिलीट

IPL 2021 मध्ये नव्या वादाने तोंड वर काढलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) ऑलराऊंडर डॅनियल ख्रिश्चन (Daniel Christian) याच्यावर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) नेटमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बॉलिंग टाकायला नकार दिला, असं ख्रिश्चन या व्हिडिओमध्ये म्हणाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) ऑलराऊंडर डॅनियल ख्रिश्चन (Daniel Christian) याच्यावर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) नेटमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बॉलिंग टाकायला नकार दिला, असं ख्रिश्चन या व्हिडिओमध्ये म्हणाला. ग्रेड क्रिकेटर या युट्यूब चॅनलवर ख्रिश्चनने मुलाखत दिली, पण ख्रिश्चनने कराराचं उल्लंघन केल्याचं सांगत युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. या कार्यक्रमात डॅनियल ख्रिश्चनने विराट कोहलीबद्दल काही वक्तव्यंही केली. मैदानाबाहेरच्या टीम बैठकांमध्ये विराट फक्त अर्धावेळच असतो, असंही ख्रिश्चन या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला. डॅनियल ख्रिश्चननेकेलेली ही वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाली, तसंच अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाईट्सवरही या बातम्या प्रसारित करण्यात आल्या.

भारत आमि न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आहे, या फायनलच्या तयारीसाठी विराटने न्यूझीलंड आणि आरसीबीच्या टीमकडून खेळणाऱ्या काईल जेमिसनला नेटमध्ये बॉलिंग करायला सांगितली, पण जेमिसनने बॉलिंग करण्यास नकार दिला, असं सांगण्यात आलं.

डॅनियल ख्रिश्चन याने वैयक्तिकरित्या विनंती केल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकल्याचं द ग्रेड क्रिकेटर आणि कार्यक्रमाचे निवेदक सॅम पेरी यांनी सांगितलं. याचसोबत ख्रिश्चनला या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि कराराचं उल्लंघन केल्याबद्दल इशाराही देण्यात आला, असं सॅम पेरी म्हणाले. या कार्यक्रमात आलेल्या काईल जेमिसनलाही अशाच प्रकारे टीमकडून इशारा देण्यात आला का? याबाबत आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया पेरी यांनी दिली.

आरसीबीनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला होता, पण अचानक हा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी का करण्यात आली, याचं कारण माहिती नसल्याचं वक्तव्य पेरी यांनी केलं. तसंच अधिकृतरित्या या व्हिडिओचे कायदेशीर अधिकार आरसीबीकडे होते. आरसीबीला आता हा व्हिडिओ कोणालाही दाखवण्याची इच्छा नाही, असंही पेरी म्हणाले, तसंच आपल्याला आता बँगलोरच्या कोणत्याच खेळाडूंच्या मुलाखती मिळत नसल्याचं पेरी यांनी मान्य केलं.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, RCB, Virat kohli