Home /News /news /

Investment Tips : येत्या काही महिन्यात चांदी 80 हजारांवर जाण्याची शक्यता, तज्ज्ञ काय सांगतात?

Investment Tips : येत्या काही महिन्यात चांदी 80 हजारांवर जाण्याची शक्यता, तज्ज्ञ काय सांगतात?

बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना महामारी संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. तेजी पाहून लोक चांदीकडे आकर्षित होतील.

    मुंबई, 11 फेब्रुवारी : सामान्यतः सोन्याची गुंतवणूक (Gold Investment) अधिक चांगली मानली जाते. लोक म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund) जोखीम घेऊन जास्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात. तुम्हाला माहीत आहे का की, येणाऱ्या काळात चांदी म्युच्युअल फंड (Silver Mutual FUnd) आणि सोन्यापेक्षा कितीतरी पट जास्त परतावा देऊ शकते. यावेळी तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली तर ते तुम्हाला येणाऱ्या काळात श्रीमंत बनवू शकते. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना महामारी (Coronavirus) संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. तेजी पाहून लोक चांदीकडे आकर्षित होतील. चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल पुढील 12-15 महिन्यांत चांदीचा भाव 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची MOFSL ला अपेक्षा आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, 2022 मध्ये जागतिक चांदीची मागणी 1.112 अब्ज औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये भौतिक चांदीच्या गुंतवणुकीची मागणी 13 टक्के वाढण्याचा अंदाज आहे, जो 7 वर्षांचा उच्चांक आहे. यासह 2022 मध्ये दागिने आणि चांदीच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनुक्रमे 11 टक्के आणि 21 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. EPFO : 50 लाख सदस्यांनी केले E-Nomination; मिळतात अनेक फायदे, तुम्ही केलं का? चांदी 1.50 लाखांपर्यंत पोहोचेल, 250 टक्के परतावा देऊ शकेल 2022 आणि पुढील काही वर्षे चांदी तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. केडिया अॅडव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की, यावर्षी चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, 2024 पर्यंत चांदीचे दर दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. चांदी सध्या 61,000 च्या आसपास आहे. या अर्थाने ते 2024 पर्यंत 33 टक्के आणि 250 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते. गुंतवणुकीचा पर्याय अधिक लोक आता म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच ईटीएफची व्याप्ती वाढत आहे आणि आता लोक सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. सेबीने अलीकडेच सिल्व्हर ईटीएफ (Silver ETF) मंजूर केले आहेत. यावर्षी आतापर्यंत दोन सिल्व्हर ईटीएफ बाजारात दाखल झाले आहेत. Multibagger Stock : 'या' शेअरमुळे अवघ्या तीन महिन्यात पैसे सातपट, 1 लाख बनले 7 लाख ETF काय आहे? ETF म्हणजे सिक्युरिटीज आणि शेअर्स सारख्या अॅसटची बास्केट आहे. त्याची खरेदी आणि विक्री एक्सचेंजवर होते. त्यामुळे त्यांची फीचर्स आणि फायदे स्टॉकमधील गुंतवणुकीसारखेच असले तरी ते म्युच्युअल फंड आणि बाँड्स सारख्या इन्स्ट्रूमेंट्सचे फायदे देखील देतात. कोणत्याही एका कंपनीच्या स्टॉकप्रमाणे, ETF चे ट्रेडिंग देखील दिवसभर चालते. एक्सचेंजवरील मागणी आणि पुरवठा यानुसार त्यांच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या