मुंबई, 11 फेब्रुवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) अनिवार्य केले आहे. ईपीएफओनेही याबाबत अनेकदा ट्वीट केले आहे आणि म्हटले की, सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाला सोशल सिक्युरिटी देण्यासाठी ई-नॉमिनेशन भरावे. ही प्रक्रिया सोपी असून त्याची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे. EPFO ने सांगितले आहे की 50 लाखांहून अधिक सदस्यांनी ई-नॉमिनी दाखल केले आहेत.
EPFO ने ट्वीट करून माहिती दिली की एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत 50 लाखांहून अधिक सदस्यांनी EPFO पोर्टलवर ई-नॉमिनी दाखल केले आहेत. यापूर्वी ई-नॉमिनी दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती पण नंतर ती वाढवण्यात आली आहे पण आता त्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही.
Multibagger Stock : 'या' शेअरमुळे अवघ्या तीन महिन्यात पैसे सातपट, 1 लाख बनले 7 लाख
Thank You all the Members for your exceptional enthusiasm in filing e-Nomination & ensuring #SocialSecurity of your family/nominee.#EPFO #Services #AmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/YVzvyRs2eI
— EPFO (@socialepfo) February 9, 2022
तुम्ही नॉमिनीचे नाव ऑनलाइन जोडू शकता
>> ऑनलाइन नॉमिनेशन भरण्यासाठी सदस्यांना EPFO वेबसाइट epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, सर्व्हिस ऑप्शनवर जाऊन ड्रॉपडाऊनमधील एम्प्लॉईज निवडा. त्यानंतर सदस्य UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लिक करा.
>> तुमच्या UAN आणि पासवर्डने त्यात लॉग इन करा. तुमचे फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा. यानंतर Add Family Details वर क्लिक करा. नॉमिनेशन डिटेल्सवर क्लिक करा आणि एकूण रक्कम भरा.
>> त्यानंतर सेव्ह ईपीएफ नॉमिनेशनवर क्लिक करा. OTP जनरेट करण्यासाठी E-Sign वर क्लिक करा. सदस्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP सबमिट करा आणि तुमचे ई-नामांकन नोंदवले जाईल.
>> यामध्ये एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडले जाऊ शकतात आणि यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.