डब्लिन, 19 मार्च : मायलेकींनी एकाचवेळी सोबत लग्न केलं हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. आतापर्यंत दोन बहिण भावांची किंवा सामुहिक विवाह सोहळे पाहिले असतील मात्र असं पहिल्यांदाच झालं आहे की, एका आईने आणि मुलीने लग्न सोबत लग्न केलं. एवढंच नाही तर दोघीही एकत्रच हनीमूनला गेल्या. मायलेकींचं म्हणणं आहे की, आम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंडप्रमाणे राहिलो आहे. मुलीने म्हटंल की, लग्नाचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता जो तिनं आईसोबत घालवला.
आगळ्यावेगळ्या अशा या लग्नसोहळ्याला आलेले पाहुणेदेखील चक्रावले होते. 35 वर्षांची एसलिंग आणि 53 वर्षांची आई त्रिशा डफी यांनी एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडमध्ये राहणाऱ्या त्रिशाला एकूण सात अपत्ये आहेत.
द सन ने दिलेल्या वृत्तानुसार, मायलेकींनी त्यांच्यातील नातं आणखीन घट्ट करण्याच्या उद्देशानं लग्न केलं. दोघींचे लग्न व्हॅलेंटाइन डेला झालं. या लग्नसोहळ्यासाठी 160 पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. आयर्लंडमधील एका हॉटेलात हे विवाहसोहळे पार पाडले. एसलिंगनं 38 वर्षीय मॉरिससोबत तर आई त्रिशाने 71 वर्षीय जोई एफशी लग्न केलं.
हे वाचा : आता 'हा' देश कोरोनाचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण
मुलीने सांगितलं की, जेव्हा आईने सोबतच लग्न करण्याचा सल्ला दिला तेव्हा मला ती थट्टा करते असं वाटलं. पण जेव्हा याबद्दल आम्ही गांभीर्याने बोललो तेव्हा चांगली कल्पना आहे असं जाणवलं. जेव्हा आम्ही सोबत डिनरला जातो किंवा विकेंड एकत्र साजरा करतो तेव्हा कधीच लग्नही एकाचवेळी असं करू वाटलं नव्हतं असंही एसलिंग म्हणाली.
हे वाचा : धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुरडीला 32 वेळा भोसकलं, प्रियकरासाठी आईनंच घेतला जीव