ऑफिसला सुट्टी टाकण्यासाठी सांगितलं 'कोरोना' झाला, पण खावी लागली जेलची हवा!

ऑफिसला सुट्टी टाकण्यासाठी सांगितलं 'कोरोना' झाला, पण खावी लागली जेलची हवा!

एका तरुणाने स्वत:ला कोरोना व्हायरस झाला असल्याचं जाहीर करणे चांगले महागात पडले आहे.

  • Share this:

बीजिंग, 12 मार्च : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. जगभरात आतापर्यंत  4000 हुन जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच एका तरुणाने स्वत:ला कोरोना व्हायरस झाला असल्याचं जाहीर करणे चांगले महागात पडले आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या स्थानिक दैनिकांमध्ये याबद्दल बातमी प्रसिद्ध झाली आहे. झू असं या व्यक्तीचं नाव आहे. कोरोना व्हायरसमुळे या तरुणाने ऑफिसमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने ऑफिसमध्ये फोन करून आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती दिली. आपल्या ऑफिसमधील व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. कंपनीने त्याला तातडीने सुट्टी दिली. त्याच्या शेजारी बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही सुद्धा सुट्टी देण्यात आली. एवढंच नाहीतर 3 दिवस ऑफिसही बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु, या तरुणाची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असता त्यात तो निगेटिव्ह आढळून आला.

झू कोरोना व्हायरसच्या वैद्यकीय तपासणीत निगेटिव्ह निघाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयाचा जीव भांड्यात पडला. परंतु, कंपनीने त्याचा वैद्यकीय अहवाल मागितला असता त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठांना त्याच्यावर संशय बळावला.  अखेर कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली असता या तरुणाचा पर्दाफाश झाला. त्याने आपल्या कंपनीला सुट्टी घेत असताना, 'आपण सुपर मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा, तिथे अनेक जण मला कोरोना व्हायरसमुळे बाधित झाले' असा संशय आला होता.

पोलिसांनी जेव्हा या तरुणाची चौकशी केली असता तो खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर कंपनीने या तरुणावर कडक कारवाई केली.  कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. एवढंच नाहीतर त्याच्या या व्यवहारामुळे त्याला 3 महिन्याची शिक्षाही सुनावली. परंतु, अखेर कंपनीने थोडी नरमाईची भूमिका घेत त्याला पुन्हा कामावर घेतलं. पण, त्याला 6 महिन्याच्या मुदतीवर नोकरीवर घेतलं.

First published: March 12, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या