मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं, वजन घटण्यास होईल सुरुवात

फिट व्हायचंय पण व्यायामाचा कंटाळा; बेडवरच करा ही 3 योगासनं, वजन घटण्यास होईल सुरुवात

सर्वसाधारणपणे योगासनं एखाद्या विशिष्ट ठिकाणीच करावीत असा समज असतो; पण योगासनांचे प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच (Bed) करू शकता.

सर्वसाधारणपणे योगासनं एखाद्या विशिष्ट ठिकाणीच करावीत असा समज असतो; पण योगासनांचे प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच (Bed) करू शकता.

सर्वसाधारणपणे योगासनं एखाद्या विशिष्ट ठिकाणीच करावीत असा समज असतो; पण योगासनांचे प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच (Bed) करू शकता.

    नवी दिल्ली, 21 जुलै : सध्याच्या काळात फिटनेसला (Fitness) विशेष महत्त्व दिलं जातं. हृदयविकार, डायबेटीससारखे विकार होऊ नयेत, हे विकार झाले असतील तर ते नियंत्रणात राहावेत, लठ्ठपणा (Obesity) कमी व्हावा या उद्देशानं व्यायाम आणि योग्य आहारावर भर दिला जातो. वजन नियंत्रणासाठी आणि फिटनेससाठी जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं, सायकलिंग, पोहणं आदी गोष्टी केल्या जातात. त्याचप्रमाणे काही जण फिटनेससाठी योगासनं (Yoga) करतात. खरं तर योगासनं हा परिपूर्ण व्यायाम प्रकार मानला जातो. सर्वसाधारणपणे योगासनं एखाद्या विशिष्ट ठिकाणीच करावीत असा समज असतो; पण योगासनांचे प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच (Bed) करू शकता. `एनडीटीव्ही`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. काही योगासनं तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच करू शकता. बेडवर केल्या जाणाऱ्या योगासनांमध्ये ब्रीदिंग आणि स्ट्रेचिंगचा (Stretching) समावेश होतो. बॅलन्स योगा बेडवर करणं अवघड असतं; पण योगासनांचे काही प्रकार बेडवर सहजपणे करता येतात. वज्रासन (Vajrasana) हे सोपं आणि बेडवर करता येणारं योगासन आहे. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय दुमडून बसा. तुमचे नितंब पायांच्या टाचांवर टेकवा आणि हाताची बोटं जमिनीवर सपाट ठेवा. पाठ ताठ ठेवा, तुमचे हात गुडघ्यासमोर ठेवून समोर पाहा. तुमचे पाय दुखू लागेपर्यंत या आसनात बसा. हे आसन केल्याने हाडे, स्नायू मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते. बालासन (Balasan) हेदेखील खूप सोपं आहे. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय दुमडून बसा. आपले हात समोर पसरून डोकं खाली वाकवून बेडवर ठेवा. तुमचं डोकं दोन्ही हातांच्या मधोमध आहे ना हे पाहा. शरीर या पोझिशनमध्ये काही वेळ ठेवून मग सरळ व्हा. हे आसन केल्यानं शरीराला आरामदायी वाटेल. या आसनामुळे तणाव दूर होतो, तसंच शरीर ताणलं गेल्याने लवचीक होतं. नौकासन (Naukasana) केल्याने कमरेचा आकार नॉर्मल होतो. वजन कमी होतं. पोटाचा घेर कमी होतो. पचनक्रिया चांगली राहते. हे आसन करण्यासाठी बेडवर पाय सरळ ठेवून बसा. त्यानंतर दोन्ही पाय एकाचवेळी वर करा आणि पायाची बोटं एकाच रेषेत ठेवा. यामुळे तुमची पाठ थोडी मागे वाकली जाईल. दोन्ही हात गुडघ्याजवळ आणून हवेत ठेवा. काही वेळ या पोझिशनमध्ये बसा. ही आसनं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे वजन कमी होऊन शरीर लवचीक बनतं. पचनक्रिया चांगली राहते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.
    First published:

    Tags: Obesity, Yoga day

    पुढील बातम्या