मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मित्रानं चोरलेला मोबाईल मिळवण्यासाठी 'तो' मुलगी बनला आणि...

मित्रानं चोरलेला मोबाईल मिळवण्यासाठी 'तो' मुलगी बनला आणि...

399 रुपयांच्या डिजिटल एक्सक्यूसिव्ह प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये एकूण 84GB डेटा दिला जाईल.

399 रुपयांच्या डिजिटल एक्सक्यूसिव्ह प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये एकूण 84GB डेटा दिला जाईल.

मित्राकडून आपला मोबाईल मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीनं त्यानं कट रचला.

चेन्नई, 12 फेब्रुवारी :  मित्रानं चोरलेला आपला मोबाईल (mobile) परत मिळवण्यासाठी चेन्नईतील (chennai) एका तरुणानं वेगळीच शक्कल लढवली. मुलगी बनून त्यानं मित्रांच्या सहाय्यानं कट रचला आणि आपला मोबाईल मिळवला. पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार नोंदवली गेल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

20 वर्षांचा सारावनननं पझहल लेक (Puzhal lake)  पोलीस सठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या टोळीनं पझहल लेक (Puzhal lake) परिसरात माझं अपहरण करुन माझ्याकडील मोबाईल आणि बाईक हिसकावून घेतली, असं त्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं, या गॅंगमधील आरोपींची ओळख पटली आहे. लोकेश (वय 20) याने अन्य चौघांच्या मदतीने प्लॅननुसार हे कृत्य केलं आहे. अन्य चारजण महाविद्यालयीन विदयार्थी असून त्यात विनोद कुमार (वय 19, ओरागडम), प्रताप (वय23, गांधीनगर), प्रवीण (वय 24, कलाईवनार रस्ता) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

हे वाचा - शिक्षिकेनं रागवलं म्हणून विद्यार्थीनीनं Fake ID बनवून असं काही केलं की...

तपासात लोकेश आणि सारावनन हे दोघंही मित्र असल्याचं समोर आलं. 18 जानेवारीला सारावनननं लोकेशचा मोबाईल फोन चोरला होता. याबाबत अंबाथूर पोलीस स्टेशनमध्ये (Ambathur Police Station) तक्रारही दिली होती. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर चोरलेला फोन परत मिळवण्यासाठी लोकेशने हा कट रचला.

हे वाचा - रहस्यमय! अल्पवयीन मुलीच्या गर्भातून कसं गायब झालं भ्रूण? CID करणार तपास

इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यानं आपलं एक फेक अकाऊंट बनवलं. मुलगी असल्याचे भासवलं आणि सारावननशी मैत्री केली. त्याच्या प्रेमात पडल्याचं नाटक केलं आणि त्याला पझहल लेक परिसरात भेटायला बोलावलं. सारावनन पझहल परिसरात येताच मास्क घातलेल्या लोकेश आणि त्याच्या मित्रांनी सारवनानला मारहाण केली आणि त्याचा मोबाईल फोन आणि टू व्हिलर हिसकावून घेत ते पसार झाले.

First published:

Tags: Chennai, Crime news, Instagram