मुंबई : लग्नसराईचे दिवस आहेत त्यात नव्या आर्थिक वर्षालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नव्या आर्थिक वर्षाचं नियोजन नीट केलं नसेल तर आताच करायला घ्या. नाहीतर तुम्हाला नव्या वर्षात मोठा आयकर भरावा लागेल. आता तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या गिफ्टवरही कर द्यावा लागतो. भलेही लग्नात असो किंवा सणवाराला असो. तुम्हाला जे गिफ्ट्स येतात त्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. त्यामध्येही अशा काही गोष्टी आहेत ज्यावर आयकर द्यावा लागत नाही नेमके काय खाचखळगे आहेत काय नियम आहेत जे पाळले तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येणार नाही हे समजून घेऊया.
#TaxGuru | महिलाओं को मिले कैश के अलावा मिलने वाले गहने, गैजेट्स जैसे गिफ्ट पर टैक्स की बारीकियां जानिए टैक्स गुरू में
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) March 11, 2023
@RoyLakshman @MukeshPatelTax #TaxSaving #TaxExpert #JewelleryGiftTax #GadgetsGiftTax pic.twitter.com/e6tzmHowwz
CNBC आवाजचा विशेष कार्यक्रम टॅक्स गुरुमध्ये टॅक्सबाबत आणि नव्या टॅक्सच्या रिजिमबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. महिलांना मिळणाऱ्या रोख रकमेव्यतिरिक्त, टॅक्स गुरूमध्ये दागिने, गॅजेट्स यांसारख्या भेटवस्तूंवरील कर कसा आणि किती भरावा लागणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.
आयकर कायद्यानुसार पती-पत्नी, भाऊ-बहीण, पती-पत्नीचा भाऊ-बहीण, काका-काका किंवा रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागत नाही.
ऑनलाइन Income Tax कसा भरावा? जाणून घ्या सोप्या स्टेप्समित्राकडून भेटवस्तू घेतली तर तुम्हाला अशा भेटवस्तूवर टॅक्स भरावा लागेल. समजा एखाद्या आर्थिक वर्षात रोख किंवा वस्तुरूपात मिळालेल्या भेटवस्तूचे एकूण मूल्य 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते कलम 56(2) अंतर्गत येतं ज्यामुळे त्याला टॅक्स भरणं बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत, सर्व भेटवस्तूंच्या एकूण कर आकारला जाईल. भेट म्हणून मिळालेली जमीन किंवा घर यावरही कर आकारला जाऊ शकतो. भेटवस्तूमध्ये मिळालेल्या घराचे किंवा जमिनीचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर कर आकारला जाईल.
Maha Budget 2023 : तुमचा थकला आहे का कर? शिंदे सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणातज्ज्ञांच्या मते, करदात्याच्या आयकर स्लॅबनुसार भेटवस्तूंवर कर आकारला जातो. त्यामुळे एखादी व्यक्ती ३० टक्के आयकराच्या जाळ्यात असेल तर त्याला भेटवस्तूंवरही ३० टक्के कर भरावा लागेल.