मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आज महाराष्ट्राचं बजेट सादर केलं. हे बजेट सादर करताना त्यांनी घोषणांचा पाऊस केला आहे. शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यापर्यंत आणि मुलींपासून ते महिलांपर्यंत अगदी शिक्षकांपर्यंत वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. बजेट 2023 मध्ये महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर करताना त्यांनी करमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बजेटमध्ये कराबाबत काय घोषणा केलीय? - वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर - ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत - दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू - कोणत्याही वर्षासाठी, व्यापाऱ्याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापाऱ्यांना लाभ - कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापाऱ्यांना लाभ महिलांसाठी देखील मोठ्या घोषणा केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. तर राज्य सरकारने आता लेक लाडकी योजना नव्या सुरुपात सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.या योजनेंतर्गत पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये तर पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. मुलगी 11 वीला गेल्यानंतर 8000 रुपये आणि 18 वर्षांची झाल्यावर 75000 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करायचं याबाबत सरकारकडून लवकरच सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.