• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • नाशकात फिरायला जात असाल तर खबरदार; 44 जणांवर कारवाई, गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा आदेश

नाशकात फिरायला जात असाल तर खबरदार; 44 जणांवर कारवाई, गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा आदेश

अनलॉक आणि पाऊस यामुळे नागरिक गाडी काढून फिरायला जात आहेत. मात्र जरा थांबा..अद्याप कोरोना संपलेला नाही...!

 • Share this:
  नाशिक, 20 जून : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ अजूनही खुले करण्यात आले नसले तरी सुट्टीचा दिवस पाहून अनेक उत्साही पर्यटकांनी त्र्यंबकेश्वर भागात अनेक ठिकाणी गर्दी केली होती. मात्र या उत्साही पर्यटकांना पोलिसांनी रोखलं. त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिने, दुगारवाडी आणि ब्रह्मगिरी पर्वत या ठिकाणी नाशिक, ठाणे, अहमदनगर, मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटनाला येण्यासाठी बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथे आलेल्या 44 उत्साही युवा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली. यापुढे अधिक कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता रस्त्यांवर नाकाबंदी सुरू केली आहे. त्र्यंबकेश्वरमधील पहिने, दुगारवाडी, हरिहर गड, इगतपुरीकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्यानं पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे देखील ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आदेश दिले आहेत. हे ही वाचा-मोठा धोका टळला, नाशिकमधील अपघातग्रस्त गॅस टँकर सुरक्षितरित्या उभा करण्यात यश दरम्यान राज्यात दुसरी लाट ओसरत असल्याचं येणाऱ्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. आज राज्यात 9361 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र शनिवारी ही संख्या 8 हजार 912 इतकी होती. त्यामुळे गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं दिसत आहे. सध्या अनेक भागांमध्ये अनलॉक सुरू आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यात पाऊस असल्याकारणाने नागरिकांना पर्यटनाचे वेध लागले आहे. परिणामी राज्यातील रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Maharashtra coronavirus Update)
  Published by:Meenal Gangurde
  First published: