जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / मोठा धोका टळला, नाशिकच्या द्वारका चौकातील अपघातग्रस्त गॅस टँकर सुरक्षितरित्या उभा करण्यात यश

मोठा धोका टळला, नाशिकच्या द्वारका चौकातील अपघातग्रस्त गॅस टँकर सुरक्षितरित्या उभा करण्यात यश

मोठा धोका टळला, नाशिकच्या द्वारका चौकातील अपघातग्रस्त गॅस टँकर सुरक्षितरित्या उभा करण्यात यश

गॅसचा टँकर असल्यानं स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर पुन्हा हा टँकर उभा करण्यात यश मिळालं आहे. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर, सुरक्षितरित्या गॅस टँकर उभा करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 17 जून : शहरातील द्वारका चौकात गॅस टँकर उलटल्यामुळं (Nashik Gas Tanker accident) खळबळ उडाली होती. गॅसचा टँकर असल्यानं स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर पुन्हा हा टँकर उभा करण्यात यश मिळालं आहे. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर, सुरक्षितरित्या गॅस टँकर उभा करण्यात आला. नाशिक शहरामधील द्वारका चौकात पहाटे सहा वाजेच्या सुमारास एलपीजी गॅस (LPG Gas) वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. द्वारका चौकात येणारी सर्वच महामार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. सलग 8 तासांपासून तीन क्रेनच्या साहाय्यानं टॅंकर उभा करण्याचे प्रयत्न सुरू होते, अखेर या प्रयत्नांना यश आलं. हा टँकर एलपीजी गॅसने भरलेला आहे. पुणे महामार्गाच्या दिशेने द्वारका चौकातून टँकर जात होता, त्यावेळेस चालकाचा ताबा सुटल्याने टँकर वळण घेताना उलटला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास वाहनांची वर्दळ कमी असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. द्वारका चौक हा नाशिक शहरातील प्रमुख चौक आहे. धुळे, मुंबई, औरंगाबाद, शिर्डी, पुणे या शहरांना जोडणारे सर्व प्रमुख रस्ते याच चौकात एक होतात. पहाटे हा टँकर उलटल्यानंतर, एकंदरीत परिस्थिती भयावह होती. प्रचंड गर्दी, वाहतूक आणी व्यापारी संकुलांचा हा भाग असल्यानं जर टँकरमधील गॅस लीक झाला असता तर घडू शकणारी दुर्घटना रोखणं हे मोठं आव्हान होतं. हे वाचा -  धक्कादायक! पोस्ट शेयर करत अभिनेत्रीने 14 लोकांवर केला लैंगिक शोषणाचा आरोप अग्निशमन दलाची यंत्रणा, डिझास्टर यंत्रणा या जागी सकाळपासूनच तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांतच याच चौकात आज ओबीसी आरक्षणावरून रास्ता रोकोचं आंदोलन होतं. एकंदरीत ही परिस्थिती हाताळण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. शहरातील 13 पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकारी, दंगा नियंत्रण पथकासह मोठी कुमक या चौकात तैनात करण्यात आली होती. त्यातच मोठी अडचण होती ती बघ्यांची, गॅस प्लॅन्ट कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलं होतं. या पलटी झालेल्या टँकरची पूर्ण तपासणी त्यांनी केल्यानंतर त्याचे सर्व व्हॉल्व सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आणि अखेर टँकर उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली. हे वाचा -  खूशखबर! सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त 80 फुटी महाकाय 3 क्रेन्सनं लोखंडी रोप्सनं टँकरची बांधणी केली आणि टँकरला उभं करण्याचं का सुरू झालं. सलग 8 तासांपासून सुरू असलेलं हे ऑपरेशन मोठं आव्हान होतं. कारण या जागी असलेली वर्दळ. अखेर यश आलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident , gas , nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात