
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 16 वं शतक केलं. त्याने बांगालादेशविरुद्ध 110 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह वर्ल्ड कपमधील दुसरं शतक केलं.

वर्ल्ड कपमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्द शतकी खेळी केली होती. एक वर्षाच्या बंदीनंतर केळताना त्याने वर्ल्ड कपमध्ये नाबाद 89, 3, 56, 107, 26 आणि 166 धावांची खेळी गेल्या 6 सामन्यात केल्या आहेत.

सर्वात वेगवान 16 शतकं करण्यात वॉर्नरने दुसरं स्थान पटकावलं आहे. वॉरनरने 110 डावात 16 शतकं केली असून त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली आहे. सर्वात वेगवान 16 शतकं करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर आहे.

चेंडुशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर फॉर्ममध्ये आलेल्या वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं आणि दोन अर्धशतकं केली आहेत. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वॉर्नरच्या 447 धावा झाल्या असून त्याच्यानंतर शाकिब अल हसनच्या 425 धावा झाल्या आहेत. 396 धावांसह अॅरॉन फिंच तिसऱ्या स्थानी आहे.

आयपीएलमध्ये वॉर्नरने जबरदस्त कामगिरी केली. वॉर्नर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 12 सामन्यात 692 धावा केल्या. यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश होता.




