मुंबई, 17 मे: सरकारी, तसंच खासगी संस्थांमध्ये आता नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात; मात्र त्यांचा शोध घेणं जरूरीचं असतं. अनेकदा ऑफिस वर्कसाठी, निरीक्षक म्हणून किंवा इतर कामांसाठीही अशी भरती केली जाते. इंडियन बँकेच्या आधिपत्याखाच्या इंडियन बँक ट्रस्ट फॉर रूरल डेव्हलपमेंट (IBTRD) या संस्थेमध्ये फॅकल्टी, ऑफिस सहायक आणि वॉचमन/गार्डनर या जागांसाठी करार पद्धतीनुसार नियुक्ती केली जाणार आहे. या सहा जागांसाठी अधिकृत अधिसूचनेद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. ‘स्टडीकॅफे’ने त्याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे. इंडियन बँकेच्या अधिसूचनेनुसार 6 जागांसाठी होणारी ही भरती 2 वर्षांसाठी असेल. ही भरती INDSETI हमीरपूर, बांदा आणि महोबा या ठिकाणी केली जाईल. निवड केलेल्या उमेदवारांना 6 हजार ते 20 हजार रुपयांचं वेतन व इतर भत्ते मिळतील. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करू शकतील. अंतिम मुदत 10 जून 2023 ही असेल. सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह सही केलेला हा अर्ज रजिस्टर्ड पोस्टाने किंवा बँकेच्या पत्त्यावर प्रत्यक्ष पाठवावा लागेल. भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि प्रेझेंटेशन यावरून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांना भरती करून घेण्याचं बंधन बँकेवर नसेल, असंही बँकेनं अधिसूचनेमध्ये नमूद केलंय. या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा बँकेच्या नियमांमध्ये नमूद केल्यानुसार असेल, असंही बँकेनं अधिसूचनेत म्हटलंय. महिन्याचा तब्बल 47,000 रुपये पगार अन् सरकारी नोकरी; NABI मध्ये जॉबची संधी सोडूच नका; करा अर्ज उपलब्ध 6 जागांपैकी 1 जागा INDSETI हमीरपूर इथे फॅकल्टी पदासाठी असेल, तसेच INDSETI बांदा येथे एक फॅकल्टी व एक वॉचमन पदासाठी असेल. INDSETI महोबा इथे एक फॅकल्टी, एक वॉचमन/गार्डनर व एक ऑफिस असिस्टंट पदासाठीही भरती केली जाईल. फॅकल्टी पदासाठी उमेदवाराकडे ग्रामीण विकास विषयातली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (MA/MSW) किंवा समाजशास्त्रात एमए/सायकॉलॉजी/बीएस्सी व्हेटरनरी/ बीएस्सी हॉर्टिकल्चर/ बीएस्सी अॅग्रिकल्चर/बीएस्सी अॅग्रिकल्चरल मार्केटिंग/ बीएड यांसह बीए यांपैकी कोणतीही एक शैक्षणिक पात्रता असावी. ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ मंत्रालयात भरतीची प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BSW/BA/BCom यांपैकी एक पदवी असावी. तसंच कम्प्युटरचं ज्ञानही आवश्यक आहे. वॉचमन/गार्डनरच्या जागेसाठी उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा. तसंच त्याच्याकडे शेती/बागकाम/मधमाशीपालनाचा अनुभव असावा. ISRO Recruitment: फोटोग्राफीपासून ऑटोमोबाईलपर्यंत ISRO मध्ये जॉबची संधी; असा लगेच करा अर्ज इतर नियम व अटी निवड केलेल्या उमेदवारांनी ऑफर लेटर मिळाल्यावर 15 दिवसांच्या आत नोकरीच्या ठिकाणी हजर होणं बंधनकारक आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्याची सही असलेलं आरोग्याविषयीचं वैद्यकीय प्रमाणपत्रही सोबत जोडणं आवश्यक आहे. इंडियन बँकेच्या अधिसूचनेनुसार इच्छुक व पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.