नवी दिल्ली, 11 मे: जना स्मॉल फायनान्स बँकेने (Jana Small Finance Bank) सर्व ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे. लकी क्रमांकावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही सुविधा विशेष ठरेल. ही सुविधा बँकेतील सध्याचे ग्राहक आणि नवीन ग्राहकांना मिळेल. याअंतर्गत ग्राहक त्यांच्या आवडीचा क्रमांक बचत किंवा चालू खात्याच्या क्रमांक म्हणून निवडू शकतात. I choose my number असं या योजनेला नाव देण्यात आलं आहे. अनेकांचा लकी नंबर (Lucky Number) यावर विश्वास असतो. लकी नंबरने सुरू होणारा मोबाइल क्रमांक बाळगणे, लकी नंबर असणाऱ्या तारखेला लग्न करणे किंवा लकी नंबर असणारी गाडीची नंबरप्लेट वापरणे इ. असे अनेक प्रकार नागरिक करत असतात. याच पार्श्वभूमीवर जना स्मॉल फायनान्स बँकेने ही सुविधा सुरू केली आहे. हे वाचा- येथे 1 रुपयांत गरजूंना मिळेल Oxygen Concentrator, केवळ करावं लागेल एक ई-मेल कशाप्रकारे निवडाल क्रमांक जन स्मॉल फायनान्स बँकेचे ग्राहक आता त्यांच्या बँक खात्याचे, बचत खात्याचे शेवटचे 10 अंक त्यांच्य पसंतीच्या क्रमांकानुसार शकतात. ग्राहकाने निवडलेला खाते क्रमांक विनंती करण्यात आलेल्या क्रमांकाच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. कंपनीच्या एमडी आणि सीईओंनी दिली माहिती जना स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ अजय कंवल यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आम्ही असे मानतो की ग्राहकांची बँकिंग सरळ आणि व्यक्तिगत व्हावे अशी इच्छा आहे. हे नवीन फीचर ग्राहकांना बँकेशी जोडण्यास मदत करेल, कारण ते शुभ आणि भाग्यशाली संख्या निवडतात. जना बँकेत आम्ही ग्राहकांना त्यांच्या प्राथमिकेतेनुसार अनुरुप समाधान उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.’ स्मॉल फायनान्स बँकांच्या यादीत जना स्मॉल फायनान्स बँक अव्वल आहे. 31 मार्च 2020 पर्यंत बँकेची संपत्ती, मॅनेजमेंट आणि डिपॉझिट सिस्टिम एका चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.