• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • सेक्स झाल्यानंतर पती चेक करायचा प्रायव्हेट पार्ट; लग्नानंतर अमेरिकेत गेलेल्या तरुणीचं शोषण

सेक्स झाल्यानंतर पती चेक करायचा प्रायव्हेट पार्ट; लग्नानंतर अमेरिकेत गेलेल्या तरुणीचं शोषण

शेवटी महिलेने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 7 ऑगस्ट : नवविवाहित महिलेने आपल्या पतीवर अडवणूक करणे, शोषण आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. या वर्षी मार्च महिन्यात महिलेचं लग्न झालं होतं. यानंतर ती अमेरिकेत गेली होती. महिलेचं माहेर बिहारची राजधानी पाटना येथील आहे. महिलेने अमेरिका स्थित भारतीय दूतावास आणि भारत सरकारच्या सीनियर अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत लिहिलं आहे की, माझ्या पतीने मला कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय सोडलं आहे. माझ्याकडे परत जाण्यासाठी कोणतीच मदत नाही. भारतात राहणारे माझे आई-वडिलांनी माझ्या सासू-सासऱ्यांकडून मदत मागितली. मात्र ते पतीसोबत राहण्यासाठी हुंड्याची मागणी करीत आहेत. महिलेने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली. महिलेचा पती एफ-1 स्टुडंट व्हिजावर येथे राहत आहे आणि एक फ्रेडी मॅक कंपनीत ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत आहे. महिलेने सांगितलं की, 15 जून रोजी तिच्या पतीने तिला खूप मारहाण केली. शिव्या दिल्या आणि शोषण केलं. यानंतर तिने पोलिसांनी कॉल करून याबाबत माहिती दिली. ती वॉशिंग्टन डीसीमधील वर्जिनिया येथील मॅक्लेनमध्ये राहत होती. (Husband used to check his wifes private part after having sex Exploitation of a young woman who went to America after marriage) हे ही वाचा-स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा अघोरी प्रकार; चहाच्या किटलीपायी लहानगा रुग्णालयात महिलेने तक्रारीत लिहिलं आहे की, पोलिसांनी तिची मदत केली. फेयरफॅक्स काऊंटी पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पीटीआयला सांगितलं की, मला पोलिसांनी वाचवलं अन्यथा माझा जीव धोक्यात होता. प्रेग्नेन्सी रोखण्याचा आरोप महिलेने सांगितलं की, ती 1 मार्च 2021 रोजी पतीसह अमेरिकेत आली होती. यानंतर पती तिला मारहाण करीत असे. याशिवाय माझ्या माहेरच्यांकडून हुंडा मागत असे. महिलेने आरोप केला आहे की, ती जेव्हा वॉशरुम जात असे तेव्हा पतीकडून मी गर्भधारणा रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लावला जात असे. सेक्सनंतर ओरडायचा... महिलेने सांगितलं की, अनेकदा तो माझं वजायना चेक करायचा. मी प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी काय करते हे पाहण्यासाठी तो असं करीत असे. अनेकदा तो मोबाइल फोनच्या फ्लॅशलाइटने चेक कराया, आणि कधी कधी तर बोटांनी तपासायचा. सेक्स केल्यानंतर तो माझ्यावर ओरडला आणि गर्भधारणा रोखण्याचा आरोपही लावत होता.
  Published by:Meenal Gangurde
  First published: