मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बापरे! बापाकडून लेकीच्या सासरच्यांना तगडी भेट; एक टन मासे, 250 किलो मिठाई अन् 10 बकऱ्या

बापरे! बापाकडून लेकीच्या सासरच्यांना तगडी भेट; एक टन मासे, 250 किलो मिठाई अन् 10 बकऱ्या

वडिलांनी आपल्या लेकीचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना खास ठरावा यासाठी तगड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. यामध्ये तब्बल 1 टन मासे, 250 किलो मिठाई (1 ton of fish 250 kg of sweets) आणि बरच काही पाठवलं आहे.

वडिलांनी आपल्या लेकीचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना खास ठरावा यासाठी तगड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. यामध्ये तब्बल 1 टन मासे, 250 किलो मिठाई (1 ton of fish 250 kg of sweets) आणि बरच काही पाठवलं आहे.

वडिलांनी आपल्या लेकीचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना खास ठरावा यासाठी तगड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. यामध्ये तब्बल 1 टन मासे, 250 किलो मिठाई (1 ton of fish 250 kg of sweets) आणि बरच काही पाठवलं आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै: भारतात मुलीचं लग्न (Daughters Marriage) म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींना अथवा अन्य पाहुण्यांना काहीही कमी पडू नये याची काळजी मुलीच्या वडिलांकडून घेतली जाते. मुलीच्या लग्नात खर्च करण्यासाठी वडिलांकडून कोणतीही हयगय केली जात नाही. अशात एका नववधूला तिच्या वडिलांकडून पाठवलेल्या भेटवस्तू (Gift) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. वडिलांनी आपल्या लेकीचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना खास ठरावा यासाठी तगड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. यामध्ये तब्बल 1 टन मासे, 250 किलो मिठाई (1 ton of fish 250 kg of sweets) आणि बरच काही पाठवलं आहे.

Photo Source - India today

संबंधित घटना आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथील आहे. येथील व्यावसायिक बतूला बलराम कृष्णा यांच्या मुलीचं अलीकडेच पुडुचेरी येथील एका मुलाशी लग्न झालं आहे. आंध्र प्रदेशात आषाढ महिन्याला पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुलीच्या घरच्यांकडून सासरच्या मंडळींना भेटवस्तू पाठवल्या जातात. याचाच एक भाग म्हणून राजमुंदरी येथील व्यवसायिक बतूला बलराम कृष्णा यांनी पुडुचेरीच्या यनम येथील आपल्या मुलीला या भेटवस्तू पाठवल्या आहेत.

हेही वाचा-जगातलं सगळ्यात महाग आईसक्रीम दुबईत, किंमत ऐकून चक्रावून जाल!

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बतूला यांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींना 1000 किलो मासे, 1000 किलो भाजीपाला, 250 किलो किराणा, 250 डब्बे लोणचे, 250 किलो झिंगा, 250 किलो मिठाई, 50 किलो चिकन आणि 10 बकऱ्या अशा तगड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. वडिलांनी मुलीला पाठवलेल्या या भेटवस्तू सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा-पैसे मोजून खा 'तुरुंगाची हवा', जेलमध्ये मिळतात 'या' सुविधा

विशेष म्हणजे अलीकडेच,  यनम येथील अग्रणी व्यावसायिकाचा मुलगा पवन कुमार याचा राजमुंदरी येथील बतूला बलराम कृष्णाची यांची मुलगी प्रत्युषाशी विवाह झाला. प्रत्युषा ही आपल्या सासरच्या घरी पहिलाच आषाढ महिना साजरा करत आहे. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्युषाच्या वडिलांनी तिला अशाप्रकारे मोठ्या संख्येनं भेटवस्तू पाठवल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Andhra pradesh