मराठी बातम्या /बातम्या /Viral /जगातलं सगळ्यात महाग आईसक्रीम दुबईत, किंमत ऐकून चक्रावून जाल!

जगातलं सगळ्यात महाग आईसक्रीम दुबईत, किंमत ऐकून चक्रावून जाल!

दुबई हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी दुबई (Dubai) हे हॉट डेस्टिनेशन असतं. दुबईत तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पर्यटकांना पाहायला मिळतात. मग त्याला आईसक्रीम (Most expensive Ice cream) तरी अपवाद कसा असेल?

दुबई हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी दुबई (Dubai) हे हॉट डेस्टिनेशन असतं. दुबईत तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पर्यटकांना पाहायला मिळतात. मग त्याला आईसक्रीम (Most expensive Ice cream) तरी अपवाद कसा असेल?

दुबई हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी दुबई (Dubai) हे हॉट डेस्टिनेशन असतं. दुबईत तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पर्यटकांना पाहायला मिळतात. मग त्याला आईसक्रीम (Most expensive Ice cream) तरी अपवाद कसा असेल?

पुढे वाचा ...

    दुबई, 21 जुलै : दुबई हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांसाठी दुबई हे हॉट डेस्टिनेशन असतं. दुबईत तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पर्यटकांना पाहायला मिळतात. मग त्याला आईसक्रीम तरी अपवाद कसा असेल? आईसक्रीम हा सर्वांच्याच आवडता पदार्थ आहे. आईसक्रीम आवडत नसलेल्या व्यक्ती अगदीच दुर्मीळ असतील. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची आईसक्रीम निवडतो. चवीप्रमाणेच किमतीवरदेखील आईसक्रीम निवडलं जातं. कोणी कोन आईसक्रीम खातं, कोणी कँडी, कप, पॉट तर कोणी फॅमिली पॅक घरी नेऊन भरपूर आईसक्रीमचा आनंद लुटतं. तरीही कोणी 60 हजार रुपये आईसक्रीमवर खर्च करेल असं वाटतं का? नाही ना! पण दुबईत (Dubai) मिळणारं आईस्क्रीम मात्र याला अपवाद आहे. अपवाद अशा अर्थाने, की ते जगातलं सर्वांत महागडं आईसक्रीम (World's Most Expensive Ice Cream) आहे. त्याची किंमत तब्बल 840 डॉलर्स म्हणजे सुमारे 60 हजार रुपये एवढी आहे.

    अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लॉगर शेनाझ ट्रेझरीवाला (Shenaz Treasurywala) हिने अलीकडेच दुबईतल्या या महागड्या आईसक्रीमची चव चाखतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध केला आहे.

    एवढी किंमत ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्की असं आलं असेल, की 'एवढं काय सोनं लागून गेलंय का त्या आईसक्रीमला?' या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. या आईसक्रीममध्ये खरंच 23 कॅरेट सोनंही (edible Gold) असतं. अर्थातच खाण्यायोग्य प्रकारचं सोनं त्यात वापरलेलं असतं. हे महागडं आईसक्रीम ताज्या व्हॅनिला बीन्सपासून तयार केलेलं असतं. त्यात एम्ब्रोसियल इराणी केशर, इटालियन ब्लॅक ट्रफल्सही असतात. दुबईतल्या जुमैरा रोडवरच्या एका कॅफेत हे आईसक्रीम मिळतं. या सगळ्यावर कडी म्हणजे हे आईसक्रीम Versace या इटालियन लक्झरी फॅशन कंपनीच्या अत्यंत महागड्या बाउलमध्ये सर्व्ह केलं जातं. या सगळ्यामुळे या आईसक्रीमची किंमत एवढी महागडी आहे. ब्लॅक डायमंड नावाने हे आईसक्रीम ओळखलं जातं.

    शेनाझच्या पोस्टवर युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.आईसक्रीमसाठी एवढे पैसे मोजणं म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखं आहे. त्यापेक्षा तेवढ्याच पैशांत दुसऱ्या काही चांगल्या, उपयुक्त गोष्टी करता आल्या असत्या, अशा प्रतिक्रियाही त्यात आहेत.

    आईसक्रीमचा इतिहास बराच जुना असून, ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात याचा शोध लागला असू शकतो, असे संकेत मिळतात. 16व्या शतकात इंग्लंडमध्ये सध्याच्या स्वरूपातलं आईसक्रीम केलं गेलं असावं, असं सांगितलं जातं. 12 मे 1777 रोजी न्यूयॉर्क गॅझेटमध्ये आईसक्रीमची पहिली जाहिरात फिलीप लेंजी यांनी प्रसिद्ध केली होती. 1813 साली डॉली मॅडिसन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मॅडिसन यांच्या दुसऱ्या शपथविधीवेळी व्हाइट हाउसमध्ये स्ट्रॉबेरी आईसक्रीमची निर्मिती केली होती.

    First published:
    top videos