मराठी बातम्या /बातम्या /Viral /पैसे मोजून खा 'तुरुंगाची हवा', जेलमध्ये मिळतात 'या' सुविधा

पैसे मोजून खा 'तुरुंगाची हवा', जेलमध्ये मिळतात 'या' सुविधा

जगाच्या पाठीवर असं एक ठिकाण आहे, जिथे लोक तुरुंगामध्ये (Jail) राहण्यासाठी पैसे मोजत आहेत आणि आनंदाने तुरुंगात जात आहेत. The Margate AirBnB मध्ये हे ठिकाण आहे.

जगाच्या पाठीवर असं एक ठिकाण आहे, जिथे लोक तुरुंगामध्ये (Jail) राहण्यासाठी पैसे मोजत आहेत आणि आनंदाने तुरुंगात जात आहेत. The Margate AirBnB मध्ये हे ठिकाण आहे.

जगाच्या पाठीवर असं एक ठिकाण आहे, जिथे लोक तुरुंगामध्ये (Jail) राहण्यासाठी पैसे मोजत आहेत आणि आनंदाने तुरुंगात जात आहेत. The Margate AirBnB मध्ये हे ठिकाण आहे.

  मुंबई, 21 जुलै : हे वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, मात्र ते खरं आहे. जगाच्या पाठीवर असं एक ठिकाण आहे, जिथे लोक तुरुंगामध्ये (Jail) राहण्यासाठी पैसे मोजत आहेत आणि आनंदाने तुरुंगात जात आहेत. The Margate AirBnB मध्ये हे ठिकाण आहे. कोणताच गुन्हा न करता सुमारे 9500 रुपये देऊन लोक येथे जेलचा अनुभव घेत आहेत.

  आपल्याला हेच माहिती असतं, की केवळ गुन्हा केल्यावरच लोकांना तुरुंगात हवा खावी लागते. मात्र The Margate AirBnB मध्ये लोक जेलमध्ये राहण्यासाठी पैसे देतात आणि आनंदाने जेलमध्ये जातात. जगाच्या पाठीवरची ही एक विचित्र जागा आहे. बेड्या न घालता या ठिकाणी असणाऱ्या भूमिगत (Undeground) जेलमध्ये लोकांना ठेवण्यात येतं. एका बराकीमध्ये दोन व्यक्ती असतात, सोबतच लोकांना सर्व सुविधा सुद्धा देण्यात येतात, त्यामुळे हे केवळ नावापुरतंच जेल असतं.

  जेलमध्ये मिळतात 'या' सुविधा

  कोणत्याही खऱ्या कारागृहाप्रमाणेच इंटिरियर असलेल्या या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा दिल्या जातात. त्यांचे बेड इजिप्शियन कॉटन शीटनं आच्छादित असतात. त्यांना चहा आणि कॉफी दिली जाते. या ठिकाणी बाग आहे आणि बार्बेक्यूची (Barbeque) सुविधाही दिली जाते. तसंच इकडे सेंद्रिय भाजीपाल्यापासून सर्व अन्न बनवलं जातं. Penny Rope नावाचं हे ठिकाण रोमांचक मुक्कामासाठी अगदी परफेक्ट (Pefect) म्हणून ओळखलं जातं. कारण या ठिकाणी व्हीआयपी (VIP) जेलचा अनुभव मिळतो.

  जेलमध्ये राहण्यासाठी द्यावे लागतात पैसे

  साधारणत: गुन्हा केल्यावर कैद्यांना जेलमध्ये पाठवलं जातं; मात्र या ठिकाणचे कैदी स्वत:च्या इच्छेने येतात आणि त्यांना जेलमध्ये राहण्यासाठी पैसेही मोजावे लागतात. या आलिशान जेलमध्ये राहण्यासाठी एक रात्रीचे (One Night In Lockup) 95 पौंड म्हणजेच भारतीय चलनात 9 हजार 600 रुपये द्यावे लागतात. या ठिकाणचा अनुभव घेऊन गेलेल्या लोकांनी या जागेला अतिशय मनोरंजक ठिकाण असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी आलेले लोक इथलं डिझाइन (Design) आणि क्रिएटिव्ह इंटीरियरच्या (Creative Interior) मोहात पडतात. आपण सोलो ट्रिपवर असाल किंवा फॅमिली व्हेकेशनवर (Family Vacation) असाल, तर हे ठिकाण वेगळाच अनुभव देणारं आहे.

  First published:
  top videos