जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अचानक हृदयाचे ठोके वाढत असतील तर या गोष्टींकडे दुर्लक्ष नको; कारणे उपाय जाणून घ्या

अचानक हृदयाचे ठोके वाढत असतील तर या गोष्टींकडे दुर्लक्ष नको; कारणे उपाय जाणून घ्या

अचानक हृदयाचे ठोके वाढत असतील तर या गोष्टींकडे दुर्लक्ष नको; कारणे उपाय जाणून घ्या

हृदय गती 1 मिनिटात 60 ते 100 च्या दरम्यान नॉर्मल असते. हृदयाचे ठोके अचानक वाढल्यावर घाबरून जाण्याऐवजी आपण शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण, जेव्हा आपण घाबरतो तेव्हा हृदयाची गती आणखी वाढू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै : हृदयाचे ठोके अचानक वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, अस्वस्थता, कमी रक्तदाब, चक्कर येणे आणि अशक्तपणा अशा अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात तेव्हा मन अस्वस्थ होऊ शकते आणि श्वास घेताना अस्वस्थता जाणवू शकते. हृदयाची गती जाणून घेण्यासाठी, बोटांनी दाब न देता हाताचे मनगट धरा आणि 1 मिनिटात हृदयाचे ठोके किती वेळा वाढत आहेत याकडे लक्ष द्या. हृदय गती 1 मिनिटात 60 ते 100 च्या दरम्यान सामान्य असते. तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढल्यावर घाबरून जाण्याऐवजी तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही घाबरत असता तेव्हा तुमच्या हृदयाची गती आणखी वाढू शकते. हृदयाचे ठोके अचानक वाढल्यावर दीर्घ श्वास घेतल्याने आराम (Increased Heart Rate) मिळतो. हेल्थलाईन च्या माहितीनुसार खालील कारणांमुळे हृदय गती अचानक वाढू शकते - - उच्च ताप - चिंता आणि अस्वस्थता - काही रोगांच्या औषधांमुळे - ताण-तणाव - वर्कआउट किंवा व्यायाम केल्यानंतर - थायरॉईडमुळे - अशक्तपणा - हृदयाशी संबंधित आजार वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यासाठी या पद्धती वापरा - हृदया ठोके किंवा हृदयाचे गती अचानक वाढल्यास, या पद्धतींचा अवलंब केल्यास हृदयाचे ठोके परत सामान्य होऊ शकतात. आपल्या आजूबाजूचे वातावरण चांगले आल्हाददायक आणि आरामदायक आहे का याची खात्री करा. उच्च तापमानामुळे रक्त परिसंचरण वाढू शकते, ज्यामुळे हृदय गती वाढण्याचा धोका वाढू शकतो. हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा कधीकधी भावनिक किंवा तणावाखाली राहिल्याने हृदय गती वाढू शकते, म्हणून तणाव टाळून शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि शांतपणे दीर्घ श्वास घ्या. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर हृदयाचे ठोके वाढत असताना तुम्ही कुठेतरी बसले असाल तर हळूहळू उठा, अचानक उठणे टाळा कारण अचानक धक्क्याने उठल्यास हृदयाचे ठोके आणखी वाढू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात