मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अजबच! सरळ नाही उलटं चालण्याने होतं वजन कमी

अजबच! सरळ नाही उलटं चालण्याने होतं वजन कमी

उलटं चालताना जास्त कॅलरीज बर्न (Burn Calories) होता. यामुळे वेट लॉससाठी (Weight Loss) जास्त फायदा होतो.

उलटं चालताना जास्त कॅलरीज बर्न (Burn Calories) होता. यामुळे वेट लॉससाठी (Weight Loss) जास्त फायदा होतो.

उलटं चालताना जास्त कॅलरीज बर्न (Burn Calories) होता. यामुळे वेट लॉससाठी (Weight Loss) जास्त फायदा होतो.

दिल्ली,29 जुलै : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि हेल्दी आहार (Exercise & Healthy Diet) महत्त्वाचा आहे. व्यायाम करायला मिळत नसेल तर, किमान अर्धा तास वॉक (Walk) करणं महत्वाचं आहे. मात्र, बऱ्याच जणांना दररोज एकाच पद्धतीने जाणं कंटाळवाणं वाटायला लागतं. हा कंटाळा दूर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने चालण्याची किंवा जॉगिंग करण्याची सवय लावू शकता. सरळ चालण्याऐवजी उलटं चालल्यामुळे (Backward Walking) आरोग्याला फायदे मिळू शकतात.

उलट चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत (Mussels) होतात, बॉडी बॅलन्स वाढतो, स्टॅमिना वाढतो आणखीनही बेरच फायदे होतात पाहूयात.

गुडघ्यांना फायदा

चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणारे स्नायूंवरचा तणाव कमी होतो.

(घरातल्या पदार्थांनी करा ‘Weight loss Drink’तयार; जेवणानंतर घेण्याने व्हाल सडपातळ)

स्नायूंसाठी फायदेशीर

आपल्या शरीरामधील हॅमस्ट्रिंग्स, क्वॉड्स आणि काफ मसल्सचा जास्त वापर होत नाही.

(महिलांसाठी केळं आहे वरदान; पहा दररोज खाण्याचे फायदे)

कारण सरळ चालताना यावर भार येत नाही. मात्र, उलटं चालण्यामुळे या स्नायूंचाही वापर होऊन मजबुती येते. उलटं जाण्यामुळे शरीर आणि पायाचे स्नायू लवचिक बनतात.

(राज्यात वाढतेय वाघोबांची संख्या; सर्वाधिक वाघ कुठे? पहा टॉप 7 व्याघ्र अभयारण्य)

कॅलरिजचा जास्त वापर

उलटं चालताना किंवा धावताना आपल्या शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होता. यामुळे वेटलॉससाठी जास्त फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी उलटं जाण्याची सवय लावा.

First published:
top videos

    Tags: Types of exercise, Walk, Weight loss